वाघूर धरण 
महाराष्ट्र

वाघूर धरणाचे प्रथमच उघडले सर्व वीस दरवाजे; ४९ हजार क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग

वाघूर धरणाचे प्रथमच उघडले सर्व वीस दरवाजे; ४९ हजार क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्‍ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मध्‍यंतरी दोन– तीन दिवस विश्रांती घेतलेल्‍या पावसाने पुन्‍हा हजेरी लावली. महिनाभरापासूनच्‍या पावसामुळे वाघूर नदीला पुर आला होता. यातच दमदार पावसामुळे वाघूर धरणातील पाण्याची पातळी वाढल्‍याने आज सकाळी धरणाचे सर्व वीस दरवाजे उघडण्यात आले. यामुळे धरणातून ४९ हजार ६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

सुरवातीला कमी पावसानंतर महिनाभरापासून सुरू असलेल्‍या सततच्‍या पावसाने वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे आज (ता.२८) सकाळी सातला धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणात आणखी पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या ४९ हजार ६१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT