Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

भाजीपाला दुकानात गुटख्याचे घबाड,‌ सट्टापेढी; पावणेआठ लांखाचा गुटखा जप्त

भाजीपाला दुकानात गुटख्याचे घबाड,‌ सट्टापेढी; पावणेआठ लांखाचा गुटखा जप्त

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी स्वतः आज सिंधी कॉलनी परिसरातील भाजीपाला मार्केट मध्ये चालवल्या जाणार्या सट्टापेढीवर छापा (Jalgaon) टाकला. भाजीपाला दुकानातच गुटख्याचे (Gutkha) गोदाम आणि सेाबतच सट्टापेढी चालवली जात असल्याचे निदर्षनास आले असून ४ लाख ६७ हजार १२० रुपयांच्या रोकडसह ७ लाख ८२ हजार ४६४ रुपयांचा गुटख्याचा साठी पोलिसांनी जप्त केला आहे. (Jalgaon news Police Action)

सहायक पोलीस (Police) अधिक्षक कुमार चिंथा यांना शहरातील सिंधी कॉलनी परिसरात खुलेआम सट्टापेठी चालवली जाते. तसेच त्याच ठिकाणी गुटख्याचा मोठ्या प्रमाणाावर साठवणुक करण्यात आल्याच्या माहितीवरुन छाप्याचे नियोजन करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता यांनी स्वतः या ठिकाणी अचानक छापा टाकला असता त्यांना भाजीपाला मार्केट मधील रमेशचंद्र जेठानंद चेतवाणी, दिपक रमेश चेतवाणी (रा.कंवरनगर) यांच्या खुशी किरणा दुकानात छापा टाकण्यात आला.

रोख रक्‍कमेसह गुटखा जप्‍त

सट्टापेढीतून ४ लाख ६७ हजार १२० रुपयांची रेाकड मिळून आली असून ७ लाख ८२ हजार ४६४ रुपयांचा गुटख्याचा साठा मिळून आला आहे. सहाय्यक पेालिस अधीक्षकांच्या पकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सुनील पाटिल, प्रदिप बोरुळे, प्रमोद कठोरे, विनयकुमार देसले, किरण धनके, महेश महाले, रविंद्र मोतिराया अशांच्या पथकाने पंचानामा करुन एकुण १२ लाख ४९ हजार५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपनिरीक्षक दत्तात्र्यय पोटे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पेालिसांत संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Sambhajinagar : बनावट विद्यार्थी दाखवून लाटले साडेसहा कोटी रुपये; चार महाविद्यालयांकडून करण्यात आली फसवणूक

Rava Ladoo Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा रवा लाडू घरच्याघरी कसा बनवायचा?

Peplum kurti with plazo: रक्षाबंधनला ट्राय करा स्टाईल आणि कम्फर्टचा बेस्ट कॉम्बो असलेला पेप्लम कुर्ती आणि पलाझो

Nagpur Zoo Shocking : १८ फुटांची लोखंडी जाळी ओलांडून वाघाच्या पिंजऱ्यात शिरला तरुण, पुढे जे घडलं ते भयंकरच...पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT