Gulabrao patil
Gulabrao patil 
महाराष्ट्र

जिल्‍हा बँकेकडून यंदा चांगल्‍या प्रकारे कर्ज वाटप : गुलाबराव पाटील

संजय महाजन

जळगाव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्‍ध करून दिले जात असते. यात अडचणी येत असल्‍याने अनेक शेतकरी हे कर्जापासून वंचित राहत असतात. यंदा मात्र असे झाल्‍याचे दिसून आलेले नाही. जळगाव जिल्‍हा बँकेकडून देखील चांगल्‍या प्रकारे कर्ज वाटपाचे काम केल्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे सांगितले. (jalgaon-news-Gulabrao-Patil-Distribution-farmer-loans-from-District-Bank-in-good-way-this-year)

खरीप हंगामासाठी जिल्‍हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाते. मात्र गेल्‍या काही वर्षात सर्वच शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नव्‍हते. तांत्रिक अडचणींसह काही कारणांमुळे काही शेतकरी वंचित राहिले होते. याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्‍हणाले, की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात कर्ज वाटप झाले आहे. जिल्‍हा बँकेने योग्‍य नियोजन करून शेतकरीला कर्ज उपलब्‍ध करून दिले आहे. कारण कर्ज मिळाले नाही; अशी आतापर्यंत तक्रार आलेली नाही. तरी देखील ज्‍यांना कर्ज मिळाले नसेल; त्‍यांच्‍यापर्यंत पोहचून त्‍या शेतकऱ्याला कर्ज कसे मिळेल यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांनी कर्जमाफीचे अभिनंदन करावे

देवेंद्र फडणवीस यांच्या युती शासनाने केलेल्या कर्जमाफी पेक्षा आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे फडणवीस यानी आघाडी सरकारच्या कर्जमाफी चे अभिनंदन करावे असे आवाहन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात पूरग्रस्तांना मदत तसेच शेती कर्जमाफी करण्याच्या बाबतीत उल्लेख केला आहे. याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नावर मंत्री पाटील म्हणाले, की पूरग्रस्तांना मागची मदत एनडीआरफ निकषापेक्षा अधिक होती, त्यावेळी दिलेल्या मदती पेक्षा या वेळी देण्यात येणारी मदत निश्चित वेगळी आहे. या शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात दिलेली कर्जमाफी पेक्षा आता आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फायदेशीर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Video: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

Tharla Tar Mag: सायली अर्जुनमधील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार का? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

Ghatkopar Hoarding News | घाटकोपरमध्ये दुर्घटनास्थळी पेट्रोल पंपाला आग, बचाव कार्य सुरू

लातूर पाेलिसांचा क्लबवर छापा, जुगार खेळणा-या 74 जणांवर गुन्हा दाखल, 2 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT