Jalgaon District Water Lavel Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : भूजल पातळीत सव्वा मीटरपर्यंत घट; जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यातील भीषण वास्तव

Jalgaon District Water Lavel : जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा भूजल पाणी पातळीतील घट कमी असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे

संजय महाजन

जळगाव : एकीकडे जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका जाणवत असून काही ठिकाणी पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूजल पाणी पातळीत पाऊण ते सव्वा मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा भूजल पाणी पातळीतील घट कमी असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. तरी देखील जळगाव जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्या वर गेले असल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचा परिणाम पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. 

वरीष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील पाच वर्षाची पाणी पातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ तालुक्याची पाणी पातळी मोजली जाते. तसेच जिल्ह्यातील विहीरींचेही निरीक्षण केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी निश्‍चीत केली जाते. गेल्या वर्षी १३० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले तरी यंदा एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

सहा तालुक्यातील पाणी पातळी खालावली 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात अधिक पाण्याची समस्या पाहण्यास मिळते. यंदा मात्र जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर या सहा तालुक्यात ०.७७ ते १.११ मीटर मीटरपर्यंत भूजल पाणी पातळीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात पाण्याचे स्रोत आटून पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीत अल्प स्वरूपात घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT