Injured Govinda Died In Jalgaon Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Dahihandi: मृत्यूशी झुंज अपयशी! दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, पाहा VIDEO

Injured Govinda Died In Jalgaon: नितीन चौधरी असं मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अशामध्ये नितीनच्या कुटुंबीयांना मदत केली जावी अशी मागणी केली जात आहे.

Priya More

दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ही घटना आहे. नितीन चौधरी असं मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अशामध्ये नितीनच्या कुटुंबीयांना मदत केली जावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये दहीहंडीवेळी थरावर थर लावण्याच्या प्रयत्नात एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता. या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन चौधरी असं या मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. नीतीन पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॉपवर आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये सहभागी झाला होता. दहीहंडी फोडण्यासाठी नितीन सहभागी असलेल्या गोविंदा पथकाने थरावर थर लावण्यास सुरूवात केली होती.

दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत असताना नितीनचा पाय घसरला आणि तो खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या नितीनला उपाचरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नितीन रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये कुटुंबीयांनी मदतीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत- परिवहन मंत्री

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

SCROLL FOR NEXT