Pune Politics: भाजपमधील 'वादाची हंडी' फुटली? अमोल बाळवडकरांच्या दहीहंडी कार्यक्रमाला चंद्रकांत पाटलांची अनुपस्थिती, चर्चांना उधाण

Chandrakant Patil: पुण्यातील बालेवाडीच्या नगरसेवकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील आले नसल्याने नाराजीची चर्चा रंगलीय.
Pune Politics:  भाजपमधील 'वादाची हंडी' फुटली? अमोल बाळवडकरांच्या दहीहंडी कार्यक्रमाला चंद्रकांत पाटलांची अनुपस्थिती, चर्चांना उधाण
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपमध्येच महाकल्लोळ सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षातील अंतर्गत वादाचं उदाहरण म्हणजे भाजपच्या नगरसेवकाने आयोजित केलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दांडी मारली. कार्यक्रमाला अनुपस्थिती राहिल्याने पुण्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यातून आपल्या व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करत असतात. पुण्यातही जागोजागी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र या भाजपमधील नेत्यांचा ड्रामा पाहायला मिळाला.

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पुण्यातील भाजपमध्ये ड्रामा सुरू झाल्याचा बघायला मिळालं. पुण्यातील भाजपचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क कोल्हापूरचे सुपुत्र आणि देशाची मान उंचवणारा निंबाच स्वप्निल कुसळेच्या नागरी सत्काराकडे पाठ फिरवल्याची दिसून आलं. पुण्यात त्यातही खास करून चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात होणाऱ्या दहीहंडी उत्सव साजरा केला गेला. बालेवाडीमध्ये होत असलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील जाणार नसल्याचं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलं. यामुळे वेगळ्याच चर्चांना पेव फुटलंय.

अमोल बाळवडकर हे भाजपचे बाणेर बालेवाडी परिसरातील नगरसेवक आहेत. काही दिवसांपूर्वी बालवडकर यांनी आपण विधानसभेची तयारी करत असल्याचं जाहीर करत चंद्रकांत पाटील यांनाच पक्षातूनच आव्हान दिलं होतं, तेच चंद्रकांत पाटील यांना आवडलं नसल्याचं बोललं जात आहे. बालेवाडी येथील दहीहंडीचा कार्यक्रम भाजपचे नगरसेवक यांनी आयोजित केला होता. या कर्मक्रमाला चंद्राकांत पाटील येणार नसल्यानं अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दहीहंडीच्या कार्यक्रमात भारताचा आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसळे येणार आहे.

या समस्त बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल पाच लाखांचा निधी धनादेश देऊन धनादेश तब्बल पाच लाखांच्या निधीचा धनादेश देऊन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसळे यांना सन्मानित केलं जाणार होतं. मात्र आता चंद्रकांत पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याने बालेवाडी भागातील ग्रामस्थांचा मोठा हिरमोड झाला. दरम्यान या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजनाविषयी चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण नव्हतं का? असा प्रश्न अमोल बलवाडकर यांना करण्यात आला.

आपण नम्रपणे निमंत्रण दिल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांना स्वप्निल कुसळे यांच्या सत्कार बद्दलची पूर्ण कल्पना दिल्याची माहिती सुद्धा दिली गेली होती.चंद्रकांत पाटील आपल्या कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर एका दहीहंडी उत्सवाला येणार आहेत. अनावधानाने त्यांच्याकडून कार्यक्रम पत्रिकेत आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा विसर पडला असेल, असं बलवाडकर म्हणाले.

बलवाडकर यांनी जरी वेळ मारुन नेली असेल तरी परिसरात मात्र वेगळीच चर्चा सुरू झालीय. बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांना आव्हान देत आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केल्याचं म्हटलं होतं. यामुळेच चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली नसल्याचं नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

कोण आहेत अमोल बाळवडकर ?

अमोल बाळवडकर हे भाजपचे बाणेर बालेवाडी परिसरातील नगरसेवक आहेत. काही दिवसांपूर्वी बालवडकर यांनी मी विधानसभेची तयारी करत असल्याचं जाहीर करत चंद्रकांत पाटील यांना पक्षातूनच आव्हान दिलं.

यामुळे भाजपमध्येच कोथरूड विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अमोल बालवडकर मागच्या विधानसभेलाही भाजपकडून इच्छुक होते. त्याचबरोबर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही बालवडकर यांनी काम पाहिला आहे. बाणेर बालेवाडी माळुंगे परिसरात विविध विकास कामावर त्यांनी जास्त भर दिला आहे.

Pune Politics:  भाजपमधील 'वादाची हंडी' फुटली? अमोल बाळवडकरांच्या दहीहंडी कार्यक्रमाला चंद्रकांत पाटलांची अनुपस्थिती, चर्चांना उधाण
Maharashtra Politics: शरद पवारांची हर्षवर्धन पाटलांशी बंद दाराआड चर्चा, विवेक कोल्हेंसोबत एकत्र प्रवास, पुण्यात मोठ्या घडामोडी; महायुतीचं टेन्शन वाढलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com