valu mafiya
valu mafiya saam tv
महाराष्ट्र

Crime: बेशुद्ध होईपर्यंत वाळू माफियांची शेतकऱ्याला मारहाण; आव्हाण्यातील प्रकार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आव्हाणे (ता.जळगाव) येथील गिरणा नदीपात्रात वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी शेतकऱ्याला बेशुद्ध होईस्तव जबर मारहाण केली. ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली असता मारहाणीत मेला तर नाही, म्हणुन मरणासन्न अवस्थेत या शेतकऱ्याला (Farmer) सोडून व ट्रॅक्टर टाकून पळ काढला. (jalgaon news girna river sand mafia beats the farmer until he is unconscious)

आव्हाणे शिवारात मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी (Girna River) पात्रालगत शेत आहे. वाळूचा प्रचंड उपसा होत असल्याने शेत विहीरीतील पाणी फाकुन जाते. तसेच वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठी चौधरी यांच्या शेतातूनच ट्रॅक्टर, डंपरचा रस्ता तयार झाला आहे. रात्री बेरात्री शेतातून या वाहनांचे ये-जा होत असल्याने शेता शेजारील थडीवरुन वाळू उपसा (Valu Mafiya) करु नका; असे मनोहर चौधरी गेल्या काही दिवसांपासूनच अनेक ट्रॅक्टर चालकांना समजुन सांगत होते. दरम्‍यान आज शुक्रवार (ता.१४) सकाळीच शेतातून ट्रॅक्टरची ये-जा होत असल्याचे कळताच चौधरी यांनी शेत गाठले.

ट्रॅक्‍टर रोखल्‍याने झाला वाद

वाळूने भरलेले ट्रॅक्टर शेतातून नेऊ नका म्हणुन त्यांनी विरेाध केल्याने वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन वाळू माफियांनी मनोहर चौधरींना बेदम मारहाण केली. मारहाणीत चौधरी हे बेशुद्ध झाले. इतक्यात चौधरी यांना मारहाण होत असल्याचे कुटूंबीयांना कळताच कुटूंबीयांसह ग्रामस्‍थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नदीपात्राच्या दिशेने धाव घेतलेल्या नातेवाईकांना बघुन चौधरी यांना मरणासन्न अवस्थेत सेाडून मारहाण करणाऱ्यांनी धुम ठोकली. तशाच अवस्थेत मनोहर चौधरी यांना घेवुन कुटूंबीयानी रुग्णालयात दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT