Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पाय घसरून नदीत पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

Jalgaon News : मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले चंपालाल बरडे हे कामानिमित्ताने धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे

Rajesh Sonwane

जळगाव : नदीवर काकूसोबत अंघोळीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नदी काठावर असताना पाय घसरल्याने ती नदीत पडली. यानंतर तिला बाहेर निघता न आल्याने नदीत बुडाली होती. दरम्यान या चिमुकलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी जळगाव तालुक्यातील रामेश्वर येथे आढळून आला.

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले चंपालाल बरडे हे कामानिमित्ताने (Dharangaon) धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे. त्यांच्या शेजारी त्यांची वहिनी अवनी बारेला देखील राहतात. दरम्यान ४ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास चंपालाल यांची मुलगी दिपीका बरडे ही काकूसह त्यांची मुलगी सिंधू व शेजारील मुलगी रिधू बारेला यांच्यासोबत नदीवर आंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन दीपीका पाण्यात बुडाली. 

सदर घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मुलीचा शोध घेतला. मात्र दीपिका हीच शोध लागला नाही. तर दुसऱ्या दिवशी (५ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजेच्या जळगाव (Jalgaon) तालुक्यातील रामेश्वर येथे दीपीका हीचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. पाण्यात मुलीचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच चंपालाल यांनी रामेश्वर येथे धाव घेतली. पाण्यात मिळून आलेला मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याची त्यांनी ओळख पटविल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, महिला-लहान मुलं जखमी

Laxman Hake : ऐन विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला, परिसरात मोठा गोंधळ, VIDEO

Maharashtra News Live Updates: पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 तारखेला जाहीर सभा

World : जगातील सर्वात स्वच्छ देश कोणता? जिथे दिसत नाही कचऱ्याचे नामोनिशान

Raj Thackeray News :...तर मशिदीचे भोंगे बंद करु; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

SCROLL FOR NEXT