जळगाव : एकनाथ खडसे यांनी झाले गेले विसरून जा, बसून मिटवून घेऊ असे वक्तव्य केले आहे. यावर आपण ठाम आहोत. ऐवढच नव्हे तर या गोष्टीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुद्धा साक्षीदार आहे. आजू बाजूचे लोक साक्षीदार असल्याचे सांगताना (Eknath Khadse) खडसे यांनी आपल्या समोर येवून असे आपण बोललो नसल्याचे सांगून द्यावे; असे आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले आहे. (Jalgaon News Eknath Khadse)
झाल गेल विसरून जा, बसून मिटवून घेऊ अशा प्रकारचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केल्याचा गौप्यस्पोट भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केल्याने राजकीय शेत्रात खळबळ उडाली होती. यासंदर्भात एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी आपण असे कधीही बोललो नसल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी सांगितलेल्या विषयाचे खंडन केले होते. भुसावळ (Bhusawal) येथे रीपाई पक्षाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गिरीश महाजन बोलत होते.
खडसे यांच्या भाजपमध्ये वापसीविषयी चर्चा सुरू असल्याचे गिरीश महाजन यांना सांगितले असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. ते दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांना भेटीसाठी गेले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. ते त्यांना कोणत्या कारणासाठी भेटायला गेले हे आपल्याला माहीत नाही. मात्र ते अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले होते; हे नक्की असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
त्याबाबत नेतेच निर्णय घेतील
खडसे यांच्यासोबत असलेला मन मिताव दूर करण्यासाठी भाजपची काय भूमिका आहे; असे विचारले असता याबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. मात्र याविषयी बैठक होईल का आणि निर्णय होईल एवढा हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही. असे सांगत गिरीश महाजन यांनी खडसे यांच्याविषयी भाजपची भूमिका आजही कायम आहे हे त्यांच्या बोलण्यातून दाखऊन दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.