leopard  saam tv
महाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकऱ्यांमुळे जिवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकऱ्यांमुळे जिवदान

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर (ता. जामनेर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेतकरी व गोद्री वन विभागाच्यावतीने वाचविण्यात यश आले. सदर घटना ३१ जानेवारीला दुपारी बाराच्‍या सुमारास टाका शिवारात घडली. (jalgaon news Farmers save leopard from falling into well)

अजिंठा लेणी (Ajanta Caves) डोंगररांगामध्ये वावरणाऱ्या वन्यप्राणी बिबट्या (Leopard) भक्ष्याची शिकार करताना रात्रीच्या वेळी तोंडापूर येथील मध्यम प्रकल्पाच्या बाजूला भिसन मांग याच्या शेतातील विहिरीत पडला होता. शेत करणारे कदीर शेख हे सकाळी शेतात कामासाठी गेले. दरम्‍यान विहिरिवर पाणी काढण्यासाठी गेले असता विहिरीत पडलेला बिबट्या त्‍यांना दिसून आला. त्यानी याबाबत तात्काळ डॉ. व्हि. टी. पाटील यांना माहिती दिली. तसेच वनविभागाचे कर्मचारी शब्बीर पिंजारी यांना देखील कळविण्यात आले.

लाकडी शिडी विहिरीत सोडली

सदर माहिती वनविभागाच्‍या (Forest Department) अधिकारींना देण्यात आली असता उपवन संरक्षक श्री. हौसिंग यांच्या आदेशावरून वनश्रेत्र पाल अमोल पंडित यांच्या पथकाने घटनास्थळी जावून विहिरीत पडलेल्या बिबट्याला शेताच्या शेजारील शेतकरी (Farmer) शफिक शेख, पी. व्हि. महाजन, वनपाल पी. बी. काळे, वनसरक्षक शब्बीर पिंजारी, मयुर पाटील, रमजान पिंजारी, दिलीप तडवी, वाचमन एकनाथ कोळी यांनी लाकडी शिडी एकमेकांना बांधून दोरीच्या साहाय्याने विहिरीत सोडली. रात्रभर विहिरीच्या कठड्यावर बसलेल्या बिबट्याच्या जवळ शिडी ठेवली. या शिडीच्‍या सहाय्याने बिबट्या वर चढून जंगलाच्या दिशेने जोरात पळ काढला. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे व वनविभागाच्या कर्मचारींमुळे बिबट्याला जीवदान मिळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT