Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : परिवार गणेश विसर्जनाला; घरात असलेल्या मुलाने उपचलेले टोकाचे पाऊल

Jalgaon News : वडिलांचे निधन झाल्यामुले दीपक हा जळगाव शहरातील समता नगरात वास्तव्यास असलेल्या अनिता ढोले या त्याच्या बहिणीकडे रहायला आला होता

Rajesh Sonwane

जळगाव : गणेश विसर्जनाची बाहेर धूम सुरु होती. परिवारातील सदस्य देखील गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. यावेळी घरात एकट्या असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरात समोर आली आहे. गणेश विसर्जन करून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

जळगाव (Jalgaon) शहरातील समता नगर परिसरात हि घटना घडली असून दीपक नारायण लोहार (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दीपक लोहार हा मुळ जामनेर तालुक्यातील आहे. काही वर्षांपुर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुले दीपक हा जळगाव शहरातील समता नगरात वास्तव्यास असलेल्या अनिता ढोले या त्याच्या बहिणीकडे रहायला आला होता. तर आई तोंडापुरलाच राहत होती. दीपक हा एका हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. सकाळी घरी आल्यानंतर तो दिवसभर झोपला होता. 

दरम्यान बहिण अनिता ढोले या गणपती विसर्जनाची तयारी करत होत्या. त्यांनी विसर्जनासाठी भावाला देखील उठवले. मात्र, भाऊ आला नाही. त्यानंतर अनिता ढोले या आपल्या परिवारासह गणपती विसर्जनासाठी गेल्या. यावेळी घरात कोणी नसताना दीपकने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. अनिता या घरी परतल्यानंतर त्यांना भावाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला. दिपकच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीपक हा पाच बहिणीचा एकुलता एक भाऊ होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT