Eknath Khadse
Eknath Khadse 
महाराष्ट्र

जिल्‍हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल करण्यासाठीच प्रयत्‍न : माजी मंत्री खडसे

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्‍हा बँकेत मागील पाच वर्षांपासून रोहिणी खडसे– खेवलकर कारभार पाहत आहेत. अशाच पद्धतीचा कारभार आगामी पाच वर्षात देखील चालावा याकरीता सर्वपक्षीय पॅनल तयार व्‍हायला हवे. याकरीता आता देखील सर्वपक्षीय पॅनल यासाठी सर्वांचीच अपेक्षा असून त्‍यासाठी प्रयत्‍न करत असल्‍याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे व्‍यक्‍त केले. (jalgaon-news-eknath-khadse-press-Efforts-to-form-an-all-party-panel-in-the-jdcc-bank)

मुक्‍ताईनगर येथील निवासस्‍थानी आयोजित पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते. त्‍यांनी सांगितले, की जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनल व्‍हावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. याबाबत मुंबई येथील निवासस्‍थानी जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आले व त्‍यासंदर्भात चर्चा केली. ३० तारखेला सर्व पक्षाच्‍या प्रमुख नेत्‍यांची बैठक घेवून चर्चा केली जाणार आहे. मागील वेळेस मी स्‍वतः पुढाकार घेतला होता. यावेळेस गुलाबराव पाटील पुढाकार घेत असून त्‍यासाठी सहकार्य करणार असल्‍याचे खडसे यांनी सांगितले.

ओझरखेडा तलावात २ सप्टेंबरला पाणी

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची ओझरखेडा तलावातून पाणी मिळावे; अशी अनेक वर्षाची मागणी आहे. या संदर्भात स्‍वतः पाटबंधारे बांधकाम मंत्री असताना तलावाची निर्मिती केली होती. तापी नदीतून जे पाणी वाहून जाते, ते पाणी या तलावांमध्ये टाकावे आणि या तलावातील पाणी शेतकऱ्यांना द्यावे असे या पाण्याचे रिझर्वेशन करण्यात आलेले आहे. तरी असं घडत नाही म्हणून रोहिनी खडसे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली असून जयंत पाटील यांनी तातडीने बैठक घेतली. त्‍यानुसार २ सप्टेंबरला या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुक्ताईनगर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT