Bhusawal Earthquakes Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: भुसावळमध्ये भूकंपाचे धक्‍के; घरं हादरली, भांडी पडली, नागरिकांनी घेतला धसका

भुसावळमध्ये भूकंपाचे धक्‍के; नागरिकांमध्‍ये घबराट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्‍ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहर परिसरात आज सकाळी भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. यामुळे नागरीकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Live Marathi News)

जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. रेक्‍टर स्‍केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली. शहरातील (Jalgaon News) गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याचे नागरीकांनी सांगितले. शहरात या चर्चेला उधाण आले होते.

काही घरांमध्‍ये पडली भांडी

भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक बाहेर पडत आले. तर राहुल नगरातील काही घरांमध्‍ये भांडे खाली पडल्‍याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्‍ये देखील दरवाजे हलत असल्‍याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्‍या बाहेर थांबून होते. ज्‍या भागात भांडे पडले होते, तेथे नागरीक पहाण्यासाठी जमा झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Gold Mangalsutra: 3 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

Cotton Trendy Saree: सणासुदीला दिसा स्टायलिश अन् कम्फर्टेबल; कॉटन साडीचे 'हे' ७ डिझाइन्स ठरतील परफेक्ट

Health Care Tips : सतत रूम फ्रेशनर वापरताय? तुम्हाला आहे 'या' गंभीर आजारांचा धोका

SCROLL FOR NEXT