Dhule Accident: नदीपात्रात बुडालेला ट्रक अद्याप सापडेना; अखेर एनडीआरएफच्या पथकास केले पाचारण

नदीपात्रात बुडालेला ट्रक अद्याप सापडेना; अखेर एनडीआरएफच्या पथकास केले पाचारण
Dhule Accident
Dhule AccidentSaam tv

धुळे : चार दिवसांपूर्वी झालेल्‍या अपघातामध्‍ये (Accident) शिरपूर येथील सावळदे येथे तापी नदीपात्रात ट्रक बुडाला आहे. या ट्रकचा अद्याप शोध लागलेला नसून ट्रक बाहेर काढण्यासाठी अखेर एनडीआरएफच्या (NDRF) पथकास पाचरण करण्यात आले आहे. (Letest Marathi News)

Dhule Accident
Nanded News: मुलीचं प्रेम प्रकरण समजलं, कुटुंबियांनी लेकीला क्रूरपणे संपवलं; धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं

एनडीआरएफच्या पथकाद्वारे तापी नदीपात्रात पाहणी सुरू असून ट्रकमध्ये अद्याप किती जण बुडाले आहेत; याचा उलगडा ट्रक बाहेर काढल्‍यानंतरच आज होऊ शकतो. त्यामुळे पुलाचा कथडा तोडून नदीपात्रात बुडालेल्या ट्रकला बाहेर काढण्यात आज प्रशासनास यश मिळणार का? हे बघणं औचित्याचे ठरणार आहे.

स्थानिक प्रशासन व एसडीआरएफच्या पथकाला ट्रक शोधण्यास अपयश आले होते. त्यामुळे अद्याप ट्रकमध्ये किती जणांचा बुडून मृत्यू झाला, याची कुठलीही माहिती मिळू शकलेली नव्हती. अखेर प्रशासनातर्फे या ट्रकचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकास बोलवण्यात आले असून आता एनडीआरएफच्या जवानांतर्फे तापी नदी (Tapi River) पात्रात ट्रकचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com