Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse Statement : भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटू नये; राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटू नये; राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अलीकडचे काँग्रेसचे वातावरण पाहता तसेच कर्नाटकमधील विजय लक्षात घेता. काँग्रेसमधून कोणी राष्ट्रवादी (NCP) किंवा इतर पक्षांमध्ये जाईल अशी स्थिती वाटत नाही. उलट काँग्रेसमुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्‍या आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी किंवा (BJP) भाजपमधून कोणी काँग्रेसमध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेवू नका; असे मत राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मांडले आहे. (Tajya Batmya)

सध्या तरी राज्यात कुणी काय बोलावं याचं बंधन राहिलेलं नाही. कुणी शैतान म्हणतात कोणी पप्पू म्हणतो तर कुणी काही म्हणत. राजकारणाचा (Jalgaon News) स्‍तर इतका खाली गेला आहे की जनमानसमध्ये चीड आणि किळस निर्माण झाली आहे. काहीतरी स्टॅंडर्ड असला पाहिजे. शब्दांचा वापर नीट जपून केला पाहिजे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजकीय जीवन आणि उंची लक्षात घेता असे शब्द वापरणे योग्य नाही. सदाभाऊ खोत हे इतर पक्षांसोबत गेल्यानंतर मंत्री झाले. मात्र शरद पवार यांनी अनेकांना मंत्री केले. त्यामुळे अशा पद्धतीचे शब्द उच्चारण योग्य नाही त्याचा मी निषेध करतो.

अजितदादांसोबत जळगाव विभागातील कुणी नाही

मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. स्वाभाविक त्यांना जोडीदार हवा आहे, त्यामुळे ते प्रत्येकाला आवाहन करत आहेत. याचा अर्थ असा आहे की अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेले नाही. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे आणि अजित दादांना त्यांना हे दाखवून द्यायचं आहे, की माझ्यासोबतही मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न दिसतो आहे. पण दुर्दैवाने अजून तरी त्यांना कोणी प्रतिसाद देत नाही; असे उत्तर मंत्री अनिल पाटील यांच्या अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याच्या आवाहनावर एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

कोणाची ताकद किती कळेल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही बडे नेते नव्हते. मी भाजपमधून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. अनिल पाटील हे सुद्धा भाजपातच होते. मात्र गेल्या काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकापर्यंत पोहोचला संघटन मजबूत झाले. मात्र २०१९ नंतर निवडणुका झाल्याच नाही. आता आगामी निवडणुकांमध्ये कोणाची ताकद किती आहे हे कळेल असा आव्हान सुद्धा एकनाथ खडसे यांनी मंत्री अनिल पाटील यांना दिल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT