Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: मुलाच्‍या दुर्देवी मृत्‍यूने कुटूंबासाठी काळी संक्रांत; पतंग उडविणे पडले महागात

मुलाच्‍या दुर्देवी मृत्‍यूने कुटूंबासाठी काळी संक्रांत; पतंग उडविणे पडले महागात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मकरसंक्रांत असल्‍याने लहानांपासून मोठ्यापर्यंत पतंग उडविण्याची हौस पुर्ण केली जाते. परंतु, ही हौस महागात पडली आहे. पतंग उडवित असताना दहा वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्‍यू (Death) झाल्‍याची दुर्देवी घटना हिंगोणे (ता. धरणगाव) येथे आज घडली. (Tajya Batmya)

कळमसरे (ता. अमळनेर) येथील मुळचे रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्ताने हिंगोणे येथे स्थायिक झाले आहे. महाजन कुटुंबातील अक्षय संजय महाजन (वय १०) हा मुलगा मकरसंक्रांत असल्‍याने सकाळपासूनच पतंग उडवत होता. परंतु, पतंग उडविताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा पाचवीत शिकत होता.

नागरीकांनी काढले बाहेर पण..

अक्षय विहिरीत पडल्याचे समजताच परिसरातील नागरीकांनी विहिरीकडे धाव घेत त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षयच्‍या दुर्देवी मृत्‍यूने हिंगोणे व कळमसरे गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT