Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : गिरणा नदीच्या पुलावरुन पडून इसमाचा मृत्यू

Jalgaon News : गिरणा नदीवरील पुलावरून नदीपात्रात कुणीतरी पडल्याचे दिसून आल्याने वाहन धारकांसह गुरे चारणाऱ्यांनी धाव घेतली. पुलावरुन पडलेला व्यक्ती ज्ञानेश्‍वर नन्नावरे असल्याचे ओळखले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी जवळील गिरणा नदीवर असलेल्या पुलावरून पडून एका इसमाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना १२ मार्चला सायंकाळी घडली. मात्र ही आत्महत्या आहे की (Jalgaon) काही दुर्घटना याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. (Breaking Marathi News)

जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर जळगावपासून जवळ असलेल्या गिरणा नदीच्या (Girna River) पुलावर ही घटना घडली आहे. या घटनेत बांभोरी प्र.चा. (ता. धरणगाव) येथील ज्ञानेश्‍वर गोविंदा नन्नावरे (वय ४५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गिरणा नदीवरील पुलावरून नदीपात्रात कुणीतरी पडल्याचे दिसून आल्याने वाहन धारकांसह गुरे चारणाऱ्यांनी धाव घेतली. पुलावरुन पडलेला व्यक्ती ज्ञानेश्‍वर नन्नावरे असल्याचे ओळखले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत ग्रामस्थांनी तालुका पोलिस आणि पाळधी औटपोस्टला कळवल्यानंतर दोन्ही पोलिस ठाण्यातून पोलिस पोहचले. घटना तालुका पोलिसांच्या हद्दीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खासगी वाहनाने मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खा, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे!

Calcium Rich Foods : दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देतात 'हे' ५ पदार्थ, हाडं बनतील लोखंडासारखी मजबूत

Nepal Flood: नेपाळमध्ये महापूरामुळे विध्वंस! ६१६ जणांचा मृत्यू, २५०० जण वाहून गेले; ३२० भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT