Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: झोपेतून उठताच दिसला पतीचा मृतदेह; पत्‍नीचा आक्रोश

झोपेतून उठताच दिसला पतीचा मृतदेह; पत्‍नीचा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीत एका दुकानदाराने नैराश्यातून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात याप्रकरणी अकस्मात (Jalgaon News) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष कुंदनमल लुंड (वय ५३) असे आत्‍महत्‍या केलेल्या प्रौढ व्यापाऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कर्जबाजारी पणामुळे त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे काही दिवसांपासून ते तणावात होते. शनिवारी रात्री जेवण करून झोपले.

गळफास घेतल्याच्‍या अवस्‍थेत पती

पत्नी राणीबाई ह्या सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना पती सुभाष लुंड हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे बघून तिने हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी मयत घोषित केले. सुभाष लुंड यांच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT