Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट; ४ जण गंभीर जखमी

Jalgaon News : जळगाव शहरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरून दिला जात असतो. प्रामुख्याने रिक्षांमध्ये गॅस भरण्याचे प्रमाण अधिक आहे

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्रासपणे रिक्षा व कारमध्ये केला जात असतो. जळगाव शहरात काही ठिकाणी सिलेंडरमधून अवैधपणे गॅस देखील भरून दिला जात असतो. अशाच प्रकारे कारमध्ये गॅस भरत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत ४ जण गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

जळगाव (Jalgaon) शहरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरून दिला जात असतो. प्रामुख्याने रिक्षांमध्ये गॅस भरण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच कारमध्ये देखील हा गॅस वापरला जात असतो. अशाच प्रकारे जळगाव शहरात बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने कारमध्ये गॅस भरला (Gas Cylinder) जात होता. गॅस भरत असताना भडका उडून सिलेंडरचा अचानक स्पोट झाला. या स्फोटात ओमिनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. 

सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला. त्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात गॅस भरणारे ३ जण. गाडी मालक असे चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. घटनेत भाजलेल्या गंभीर चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

याशिवाय गॅस भरणाऱ्याचे दुकान व एक दुचाकी देखील पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेचा अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण कारसह दूचाकी तसेच दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT