cyber crime 
महाराष्ट्र

क्रेडीट कार्डचे चार्जेस कमी करण्याची रिक्‍वेस्‍ट; सायबर गुन्हेगारांनी साधला डाव

क्रेडीट कार्डचे चार्जेस कमी करण्याची रिक्‍वेस्‍ट; सायबर गुन्हेगारांनी साधला डाव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मी स्टेट बँकेतून बोलत असून तुम्हाला लागणारी ऍन्युअल चार्जेस माफ करायचे असतील तर, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा. ओटीपी सांगताच क्रेडीट कार्ड (Credit Card) धारकाच्या खात्यात झाडू मारुन ६३ हजार रुपये गंडवण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-cyber-crime-Request-to-reduce-credit-card-charges)

शहरातील एमआयडीसी परिसरातील रहिवासी शिवकुमार रामसुंधर तिवारी (वय-४५) हे खासगी नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of india) या बँकेचे दोन क्रेडीट कार्ड आहेत. हे कार्ड वारण्यासाठी त्यांना वार्षीक चार्जेस द्यावे लागत असल्याने त्यांनी २४ नोव्हेंबरला कस्टमर केअरला कॉल करुन ही चार्जेस कमी करण्यात यावे यासाठी विनंती केली हेाती.

बँकेतून बोलत असल्‍याचा आला फोन

यानंतर २७ नोव्हेंबरला दुपारी १.५२ वाजेच्या सुमारास तिवारी यांना एका कस्टमर केअर नंबरवरुन महिलेचा कॉल आला. त्यांनी मै स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडीट कार्ड डिपार्टमेंट से बात कर रही हूँ.. आपको ऍन्यूअल चार्जेस माफ करना है, तो मैने आपको ओटीपी भेजा है.. वह ओटीपी मुझे बतो दो असे तीने तिवारींना सांगितले. दरम्यान तिवारी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या महिलेला सांगितला. त्यानंतर काही वेळातच तिवारी यांच्या दोन्ही कार्डमधून सुमारे ६३ हजार रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला.

कार्ड ब्लॉक झाल्याचा बहाणा

क्रेडीट कार्डमधून पैसे कपात झाल्यानंतर कस्टमर केअरमधील त्या महिलेचा तिवारी यांना कॉल आला. यावेळी ती तिवारी यांना म्हणाली की, तुमच्या क्रेडीट कार्डचा ब्लॉक झाला असून ते कार्ड मी बंद केले आहेत असे म्हणून त्या महिलेने कॉल कट केला. तिवारी यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ स्टेट बँकेत धाव घेतली. तेथून फसवणुक झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शनिवारी (ता. ४ ) एमआयडीसी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT