Cyber Crime
Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

क्रेडीट कार्ड ॲक्टीवेट करण्याचा बहाणा; शेतकऱ्याच्‍या खात्यातून लाख रूपये लंपास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : क्रेडीट कार्ड ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने बेलसवाडी (ता.मुक्ताईनगर) येथील प्रौढाची ९९ हजार ८६२ फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon news cyber crime one lakhs rupees fraud from the farmer's bank account)

मुक्ताईनगर तालूक्यातील बेलसवाडी येथे संजीव श्रीराम पाटील (वय ५४) कुटूंबीयांसह वास्तव्यास असून शेतकरी आहेत. ३ ते ५ जानेवारी दरम्यान संजीव पाटील यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे (State Bank) असे संयुक्त क्रेडीट कार्ड आले.

पोस्‍टाने कार्ड आले

कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतांनाही पोस्टाने क्रेडीट कार्ड आल्याचा संजीव पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच काळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे भासविले. तसेच पोस्टाने घरी आलेले क्रेडीट कार्ड (Cyber Crime) ॲक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांची ९९ हजार ८६२ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT