Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: केवायसी करणे पडले महागात; ऑनलाईन ९७ हजार रुपयांत गंडा

केवायसी करणे पडले महागात; ऑनलाईन ९७ हजार रुपयांत गंडा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मोबाईल बंद होणार अशी बतावणी करत केवायसी करण्याच्या नावाखाली ९७ हजार ४९६ रूपयांची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ४ फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

जळगाव शहरातील मुक्ताईनगर सुनिल अमृत पाटील (वय ५७) हे कुटूंबीयासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. शनिवार (४ फेब्रुवारी) दुपारी बारा ते घरी असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. आपला मोबाईल बंद होणार आहे असे सांगून तुम्हाला केवासी (Cyber Crime) करावी लागणार आहे. असे सांगून सुनिल पाटील यांना ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले.

ऑनलाईन अर्ज भरताच रक्‍कम वर्ग

फोनवरून समोरच्‍याने सांगितल्‍यानुसार सुनिल पाटील यांनी ऑनलाईन माहिती भरली. यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ४९६ रूपये ऑनलाईन पद्धतीने परस्पर वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात असल्यानंतर सुनिल पाटील यांनी (Jalgaon News) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सलीम तडवी करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT