महाराष्ट्र

सराफ दुकानात भरदिवसा दरोडा; डोक्‍यावर बंदूक ठेवले दागिने लंपास

सराफ दुकानात भरदिवसा दरोडा; डोक्‍यावर बंदूक ठेवले दागिने लंपास

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : शहरातील कोर्ट रस्त्यावरील व गजबजलेल्या वस्तीत असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले या ज्वेलरी दुकानात दुपारी एकच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. सराफ दुकानाचे मालक कवडीवाले यांचे कानशिलावर बंदूक ठेवत दुकानातील शोकेस फोडून सोने– चांदीचे दागिने लंपास केले. दुकानातून किती माल चोरीस गेला याबाबत अद्याप आकडा समजू शकला नाही. (jalgaon-news-crime-news-yawal-robbery-at-a-jewelry-store)

यावल येथील शिवसेनेचे शहर अध्यक्ष तथा ज्वेलरी दुकानचे संचालक जगदीश कवडीवाले हे दुपारी दुकानात असताना २० ते २५ वयोगटातील चार तरुणांनी दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला बोटाकडे इशारा करत अंगठी बनवण्याचा इशारा केला. यानंतर लगेच कवडीवाले यांच्या मानेवर पिस्तोल ठेवत शोकेस फोडून त्यातील सोन्याचा माल लंपास केला.

आरडा ओरड करताच पसार

दुकानाचे बाहेर गेल्यानंतर कवडीवाले यांनी आरडा..ओरड करताच दुचाकीवर चार जणांनी बसून पोबारा केला. परिसरातील तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. त्‍यांनी त्यांचे पिस्तोलमधून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. तसेच त्यांचेकडील दोघं पिस्तोल रस्त्यावर पडलेले आढळले. यातील एक जण धोबी गल्लीतून बस मळ्याकडे गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

रस्‍त्‍यावरही लुटले

मंगळवारीही सातोद रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास एकास मिरची पूड टाकून लूटले आहे. दरम्यान भररस्त्यावर सराफ बाजारात घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिक भयभित झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून भर दुपारी होत असलेल्या या घटनांमुळे तालुक्यात घबराट निर्माण झाली असून पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले

Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका; ठाकरे बंधूंना धक्का, बड्या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं

SCROLL FOR NEXT