निलगाय खाऊन बिबट्याचाही मृत्यू

निलगाय खाऊन बिबट्याचाही मृत्यू
Leopard
LeopardLeopard
Published On

जळगाव : विटनेर वनक्षेत्रात (ता. जळगाव) कंपार्टमेंट क्रमांक ४३८ मध्ये मृत विषप्रयोग केलेली नीलगाय खाल्ल्याने विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला. (jalgaon-news-vitner-forest-aria-Leopard-also-dies-after-eating-nilgai)

विटनेर जंगलात नीलगाय मारली जाते. ती दोन ते तीन दिवस तशीच पडून असते. तिच्या बॉडीवर विषप्रयोग होतो, तरी लक्षात येत नाही. दुर्लक्ष झाल्याने मृत नीलगाईचे विष टाकलेले मांस खाऊन बिबट्या मृत्युमुखी पडतो, ही विचार करायला लावणारी घटना आहे. बिटवरील महिला वनरक्षक अजिबात फील्डवर जात नसल्याची माहिती पोलिसपाटील व गावकऱ्यांनी दिली. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून योग्य तपास करून कारवाई होण्याची मागणी वन्यजीव सरंक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे.

Leopard
हवेतून ऑक्सिजन निर्मिती आठवडाभरात; जळगावात साकारला जातोय प्रकल्‍प

..तर बिबट वाचला असता

नीलगाय मृत्यूबाबत वन विभागाकडून माहिती देण्यात आली नसल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसपाटील साहेबराव धुमाळ यांनी सांगितले. या वनक्षेत्रात नियमित गस्त झाली असती, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. या प्रकरणाची विटनेर गावातून माहिती घेतली असता, विटनेर जंगलात नीलगाय, हरीण, मोर, कोल्हे, बिबटे यांचा मुक्तसंचार असूनही वनरक्षक किंवा इतर कोणतेही वन कर्मचारी नियमित गस्तीसाठी येत नाहीत. जंगलात अनेक लहान- मोठे वन गुन्हे घडत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वन कर्मचारी आपसातील भांडणातच व्यस्त आहेत.

कर्मचाऱ्यांचा कर्तव्‍यावर कसूर

या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी. वरील कर्मचाऱ्याचे दैनंदिनी तपासून कर्तव्यात कसूर केलेला आढळून आल्यास वनरक्षक, कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर करणे, गस्तीवर न जाणे, वन्यजीवांच्या हत्येस मोकळीक देणे, दप्तर दिरंगाई, शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरेल ती कारवाई करावी, अशी मागणी जळगाव उपवन संरक्षक विवेक होशिंग, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अनिल अंजनकर यांच्याकडे केली आहे, असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे देवरे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com