महाराष्ट्र

नात्‍याला काळीमा..चाकूचा धाक दाखवत भाचीवर अत्‍याचार

नात्‍याला काळीमा..चाकूचा धाक दाखवत भाचीवर अत्‍यावर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मामा या नात्याला काळीमा फासणारी घटना जळगावात घडली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन सख्‍ख्‍या भाचीवर मामानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-crime-news-girl-torture-uncel-Showing-fear-of-a-knife-on-the-niece)

जळगाव शहरातील तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसह वास्‍तव्‍यास आहे. पिडीत मुलगी ही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून जळगावात नातेवाईकांसोबत मिळेल ते काम करते. तिचा मामा राजाराम बारेलाल कुंजाम (रा. कोल्हे हिल्स) याने आठ दिवसांपुर्वी भाची असलेल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ व मारहाण केली.

रात्री केली अटक

सदर प्रकरणी संशयित राजाराम कुंजाम याच्या विरोधात गुरूवारी (ता. २२) रात्री पोलिसात तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला तालुका पोलीसात रात्री अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीचा विकास झटपट होणार; खटाखट मिळणार बांधकाम परवानग्या, नेमकी यंत्रणा काय?

Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, शेख हसीनांना फाशीची शिक्षा होणार?

Online Payment Safety: ऑनलाइन शॉपिंग करताना फ्रॉड होण्याचा धोका वाटतोय? 'या' सोप्या टिप्सनं सुरक्षितपणे करा डिजिटल व्यवहार

Maharashtra Live News Update: नवले पुलाबाबत उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT