BHR Scam 
महाराष्ट्र

बीएचआर घोटाळा; मुख्य संशयित झंवरला नाशिक येथून अटक

बीएचआर घोटाळा; मुख्य संशयित झंवरला नाशिक येथून अटक

Rajesh Sonwane

जळगाव : भाईदास हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील घोटाळ्यामधील मुख्य संशयित आरोपी असलेल्‍या सुनील झंवर याला आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या प्रकरणातील सर्व बाबींचा उलगडा होणार आहे. (jalgaon-news-crime-news-BHR-scam-The-main-suspect-sunil-Zanwar-was-arrested-from-Nashik)

आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी पथक तयार केले. मुख्‍य संशयीत सुनील झंवर पोलिसांना गुंगारा देवून फरार होता. अहमदाबाद, उज्जैन येथे राहिल्‍यानंतर सोमवारी रात्री नाशिक येथे पोहचला होता. नाशिकला पोहोचल्याबरोबर पोलिसांनी घराला सर्व बाजूने घेरून घेतले. झंवरच्या पडून जाण्याचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर आज सकाळी साडेदहाला पोलिसांनी त्यास अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी ज्यावेळी झंवर गॅलरीत आला. त्यावेळी त्याचे फोटो नकळत काढून तोच सुनील झंवर असल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक दहा दिवसापासून झंवरच्या मागावर होते. त्यानंतर रात्रभर सापळा रचल्यानंतर आज सकाळी १०:३० वाजता त्याला अटक करण्यात आली.

वैद्यकिय तपासणी करून पुण्याकडे रवाना

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास अटक केली. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुण्याकडे घेऊन पोलीस पथक रवाना झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सुनील झंवर याला अटक केल्याने या घोटाळ्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहचतात; याचा उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

SCROLL FOR NEXT