Corona News saam tv
महाराष्ट्र

Corona News: कोरोनाचा सुधारित ‘प्रोटोकॉल’; आठवड्यातच रुग्ण होतोय बरा

विलगीकरण आता सात दिवसांवर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट देशात, राज्यात व पर्यायाने जिल्ह्यात तिसरी लाट घेऊन आलाय. परंतु, या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतील बाधितांचा संसर्ग वेग अधिक असला तरी लक्षणे सौम्य असून त्यादृष्टीने शासनाने बाधितांच्या विलगीकरणाचा (Home Quarantine) कालावधी १४ दिवसांवरून ७ दिवसांचा केला आहे. त्यासंदर्भातील ‘प्रोटोकॉल’ जारी करण्यात आला आहे. (jalgaon news corona update news Corona modified protocol Get well within a week)

मार्च २०२०पासून कोरोनाने (Corona) देशभरात धुमाकूळ उडवून दिला. गेल्या दोन वर्षांत देशाने कडक लॉकडाऊनसह (Lockdown) अनेक निर्बंधांना तोंड दिले. त्यामुळे संपूर्ण जनजीवन कोलमडून पडले. कोरोनाच्या दोन्ही लाटा ओसरताना हे निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्ववत झाले.

विलगीकरणाचे दिवस कमी

दुसऱ्या लाटेत लक्षणे तीव्र व रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले. मात्र, विलगीकरणाचा कालावधी २१ वरुन१४ दिवसांवर करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आली तोवर उपचार पद्धती बऱ्यापैकी अवगत झाली असल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले. मात्र, त्यावेळच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटमुळे जीवितहानी मोठी होऊन अगदी तरुणांनाही जीव गमवावे लागले. या गंभीर स्वरूपात नागरिक मात्र १४ दिवसांचा विलगीकरणाचा प्रोटोकॉल पाळत नव्हते.

सात दिवसात रुग्ण होताय बरे

तिसरी लाट ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron) आल्याचे मानले जात आहे. मात्र, पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत संसर्गदर अधिक असूनही या लाटेतील आजार सौम्य स्वरुपाचा असल्याचे सध्यातरी दिसत आहे. बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून ती लवकर बरीही होत आहेत. त्यामुळे सरकारनेच या वेळी विलगीकरणासाठी सात दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे दिशानिर्देश दिले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण सात दिवसांच्या आतच बरेही होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT