जळगाव : कोरोना काळात अनेकांनी परिवार गमावला आहे. यात काही महिलांचे पती मेल्याने त्या विधवा झाल्या. अशा कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अश महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासंदर्भातील मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी (Jalgaon Collector Office) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (jalgaon news Corona death in husband and single women fight the pending question)
जळगाव (Jalgoan) जिल्ह्यात कोरोनामुळे (Corona) एकल झालेल्या महिलांबाबतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत शासनाने अनेक आदेश काढून देखील व जिल्हा कृती दल व तालुकास्तरावर मिशन वात्सल्य समिती स्थापन केली. परंतु, जिल्ह्यात सदर प्रक्रीया अत्यंत हळू सुरू आहे. याबाबत तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
अशा आहेत मागण्या
– जिल्ह्यातील सर्व कोरोना एकल महिलांना विधवा पेंशन योजना लागू करा.
– सर्व कोरोना एकल महिलंना अंतोदय योजनेतंर्गत रेशन मिळावे.
– सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्वांना तात्काळ ५० हजार रूपये मिळावे.
– बालसंगापन योजना तात्काळ लागू करावी.
– शिवणकाम, शेती, ब्युटीपार्लर अशा विविध कौशल्य असलेल्या महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा.
– सर्व शिक्षा अभियानातंर्गत प्रत्येक शाळेला आरटीई अंतर्गत मुलांना फी माफी देण्यात यावी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.