वर्धेच्या भुगांव येथील इवोनिथ मेटालिक स्टील कंपनीत बॉयलर मध्ये स्फोट झाला. घटनेत 13 ते 14 मजूर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेत बॉयलर मधून मेटल लिक्विड निघाल्याने मजूर जखमी झालेत. मेटल लिक्विडमुळे मजूर भाजल्याची माहिती आहे. जखमीना सावंगी रुग्णालयात करण्यात आले दाखल आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.
विजय तुकाराम डाकले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सदस्य पदावर कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीवर अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक विभाग अध्यक्ष म्हणून काम केलंय.
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील आहेत.या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहू नये असे वारंवार सांगुनही महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवित आहात.
शिवसेना उबाठाला पालघर जिल्ह्यात खिंडार .पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाचा मोठा धक्का . पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा उमेदवार भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झाला. भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत मिळाले होते.
नाकाबंदी पोलिसांनी दरम्यान 36 लाख रुपयाची रोकड एका चार चाकी वाहना मधून पोलिसांनी जप्त केली आहे. चाकण - शिक्रापूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान आज संध्याकाळी साडेसहा वाजता दरम्यान पोलिसांनी ही रोकड जप केली आहे. एवढी मोठी रोख रक्कम आणि वाहन नेमकं कोणाचा आहे याचा तपास सध्या चाकण पोलीस करत आहेत.
आज मविआकडून प्रचार सभा बीकेसीत होत आहे. यावेळी राहुल गांधींच्या उपस्थितीत पंचसुत्री जाहीर करण्यात आलीय. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तीन लाखांपर्यंत कर्जमाफ केले जाणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात येत आहे. पुण्यातील बिबवेवाडीत फडणवीस यांची जाहीर सभा
नांदेड उत्तरच्या जागेवरून ठाकरे गटात मध्ये मोठा वाद सुरू झालाय.ठाकरे गटाने आयत्या वेळी संगीता पाटील डक यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज झालेत.आज ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी हॉटेल विसावा येथे शिवसैनिकांची बैठक बोलावली होती.. परंतु बबन थोरात यांना शिवसैनिक आक्रमक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर थोरतांनी नांदेडमध्ये येणं टाळलं.परंतु शिवसैनिक बबन थोरात यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. बबन थोरात यांनी नांदेडची शिवसेना विकली असा आरोप करत थोरात शिवसैनिकानी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केलीय. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात २८० कोटी रुपयांचा मुद्देमाल आयोगाने जप्त केलाय. यात ७८ कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आलीय. तर, झारखंडमध्ये १५८ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे.
रक्ताचे नमुने बदल प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. फरार आरोपी अरुणकुमार सिंग याने सरेंडर केलं आहे. पुणे न्यायालयासमोर अरुणकुमार सिंग यांनी स्वतःला सरेंडर केलं. कारचालक मुलासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी विशाल आणि शिवानी अग्रवाल, अरुणकुमार सिंग यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते. अरुणकुमार सिंग यांची चौकशीसाठी पोलीस कोठडीत रवानगी होणार आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन झाले आहे. ढोल तशाच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. मंगकवेढ्यात आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यासाठी राज ठाकरे घेत आहेत जाहीर सभा होणार आहे.
सुप्रीम कोर्टाकडून डिस्क्लेमर बाबत विचारणा करण्यात आलीय. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा डिस्क्लेमर दिला जात असल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं. तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का ? असाही सवाल कोर्टाने केलाय.
पिंपरी चिंचवड शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता दरम्यान ईमेल द्वारे डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे..
आज आनंदाची गोष्ट आहे की,महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात आज जतमधून होत आहे. महाराष्ट्रातील एक नंबर मतदार संघाऐवजी सगळ्यात शेवटचं 288 क्रमांक मतदारसंघातून केली आहे. जतमधून गोपीचंद पडळकरांना आशीर्वाद द्या, राज्यात 1 नंबरचा विकास करू. दुष्काळचे राजकारण केले गेले,पाणी सोडले तर साखर कारखान्याला ऊस तोड मजूर मिळणार नाही,म्हणून पाणी दिले नाही.
देवेंद्र फडणवीस
राज्यात सर्वत्र महायुती म्हणून सर्वजण काम करत असतानाच मावळ विधानसभा मतदारसंघात मात्र महायुती मध्ये फूट पडली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मात्र मावळमध्ये महायुतीत फूट पडली असल्याचे चित्र दिसले. परंतु आता लोणावळयातील भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला असून महायुती चे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांना लोणावळा भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मावळमध्ये खुद्द भाजपमध्येच दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळमध्ये प्रत्येक पक्षात उभी फूट पडत दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मावळचा गड कोण राखणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे...
अकोल्यातल्या अकोट शहरात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट फैजान मिर्झा यांच्या वाहनाचे काचा फोडण्यात आलेय. काही अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड झाल्याच समजते. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी मिर्झा यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्यात. दरम्यान या प्रकरणात अकोट शहर पोलीस अधिक तपास करतात. मिर्झा यांच्या वाहनाचे काचा कुणी फोडल्या? आणि कोणत्या कारणांमुळे? याचा तपास पोलीस करतायत.
संविधान सन्मान संमेलनाच्या साठी राहुल गांधी चे नागपूर विमानतळावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. रेशीमबाग मधील सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहेत.
नितीन बानगुडे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन जाहिरात बाजी केली. जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असते. अशी टीका केली ते मिरजेत महाविकास आघाडी च्या बैठकीत बोलत होते. तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामन्याचा आमदार असल्याचे ही जाहीर केले.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सुराणा आणि संचेती या दोन मोठ्या बांधकाम व्यवसायिकावर आयकर विभागाने धाडी टाकले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको, पानदरिबा आणि वैजापूर शहरांमध्ये आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे. आज पहाटेपासूनच वेगळ्या टीम सध्या काम करीत आहेत.
यादी दिली नाही म्हणून आम्ही निवडणूक लढू शकत नाही हे जरांगे पाटील यांचं कारण चुकीचं असल्याच राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलंय. दलित आणि मुस्लिम संघटनांनी आधीच आपली यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली होती असेही राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले, निवडणूक लढायची नाही या जरांगे पाटील यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र मराठा आणि मुस्लिम संघटनांनी यादी दिली नाही म्हणून निवडणूक लढू शकलो नाही हे जरांगे पाटील यांनी दिलेल्या कारणामुळे समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्ही दलित आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवारांची यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली हे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यापुढेही जे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत त्यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. आपण मराठा समाजाच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हंटलय. अनेक उमेदवार आपल्या जमिनी विकून नोकऱ्या सोडून निवडणुकीला उभे आहेत अशा उमेदवारांना आम्ही बळ देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत ते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगूनही मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.. भाजपकडे असलेकी नेवसा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली असून याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आल्याने बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली आहे
धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या यशवंत सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी महायुतीच्या पाठिंब्याची घोषणा केली. मागील दीड वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेने अनेक आंदोलन केली आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज लातूर दौऱ्यावर आहेत, लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि लातूर ग्रामीण, या तीन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी ते आज जाहिर सभा घेणार आहेत.
रद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात शरद पवारांच्या सभा
शरद पवार यांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात घेणार सभा
जयंत पाटील यांच्या राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा
१३ तारखेनंतर शरद पवार पुण्यात घेणार सभा
बारामती मध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ १८ तारखेला विराट सभा
बारामती १८ तारखेला होणार शरद पवारांची भव्य सभा
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधान केल्याने केली कारवाई...
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची करणार 'हाफ सेंन्चुरी'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील १२ दिवसात ४८ सभा घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.