झाडे झाली बोलकी..शंभरच्‍यावर पुरातन झाडांवर कलाकृती

झाडे झाली बोलकी..शंभरच्‍यावर पुरातन झाडांवर कलाकृती
Pachora
Pachorasaam tv
Published On

जळगाव : रस्त्यात अडसर येणार या वृक्षांची कत्तल न करता या वृक्षांवर रंगरंगोटी करून वृक्ष बोलके करत या माध्यमातून वृक्ष संगोपनासह पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याचा प्रयत्न जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) नगरपरिषद व येथील कला प्रेमींनी केला आहे. यामुळे पाचोरा शहरातील झाडे ही बोलकी झाली आहे. पाचोरा शहरातील या अनोख्या उपक्रमामुळे रस्त्यांवर अडसर येणाऱ्या या झाडांचे संवर्धन झाले असून शहरातील सौंदर्यात देखील भर पडली आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आता बोलू लागली आहेत. (jalgaon news Artwork on hundreds of ancient trees in pachora city)

Pachora
Jalgaon: कृषी वीजबिल थकबाकीतील अकराशे कोटी माफ

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषद व स्थानिक कलाप्रेमी यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियानातंर्गत शहरातील रस्त्यावर अडसर येणाऱ्या झाडांची कत्तल न करता याच झाडांवर चित्रकलेच्या माध्यमातून झाडे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. सुशोभीकरणच नाही तर या उपक्रमामुळे पुरातन झाडांचे जतन होवून जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे (Pachora Nagar Parishad) पाचोरा शहरातील रस्त्यात अडसर येणारी झाडे आता बोलकी झाली आहेत.

शंभरच्‍यावर झाडांवर कलाकृती

पाचोरा शहरातील समाजसेवक मुकुंद बिलदीकर यांच्या संकल्पनेतून कलाप्रेमी भूषण पेंढारकर, राहुल पाटील, जितेंद्र काळे यांनी शहरातील 100 च्‍यावर पुरातन झाडांवर झाडांच्या आकाराप्रमाणे विविध कलाकृती साकारली आहे. तसेच पर्यावरण जतन करण्याचा संदेश देखील या कलाकृतीतून सादर करत एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

कला प्रेमींची साथ

माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत राज्यभरात वृक्षारोपण व वृक्ष संगोपनासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील कुठल्याही वृक्षाची कत्तल न करता या वृक्षाचे जतन करण्याचा संकल्प केला आहे. यालाच शहरातील काही कला प्रेमींची साथ मिळाली असून या कलाप्रेमींच्या माध्यमातून शहरातील रस्त्यावरील शेकडो वर्षांपासून असलेल्या पुरातन वृक्षांवर चित्रकलेच्या माध्यमातून विविध प्राणी पक्षी व पर्यावरण पूरक संदेश काढून ही झाडे बोलकी केली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com