ॲम्‍बुलन्‍स
ॲम्‍बुलन्‍स ॲम्‍बुलन्‍स
महाराष्ट्र

साडीची झोळी अन्‌ बांम्बूलेन्स ते ॲम्‍बुलन्‍स! वर्डीच्‍या विमान दुर्घटनेतील तो प्रसंग..

साम टिव्ही ब्युरो

गणपूर (जळगाव) : वर्डी (ता. चोपडा) येथील उत्तरेच्या जंगलात म्हणजे राम तलावालगतच्या सातपुडा रांगेच्या गगन कपारीत शिरपूर येथील शिकाऊ विमानाचा अपघात झाला. पण हे घडल्यानंतर जी साडीची झोळी झाली आणि अँबुलेन्सपर्यंत जखमी अंशीकाला आणण्यासाठी ज्या बांम्बूलेन्सचा प्रयोग झाला ते धाडस आणि माणुसकीचा प्रयोग सध्या सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होतोय. (jalgaon-news-copda-satpuda-aria-airplane-crash-injured-pilot-help)

सातपुड्याच्या पर्वत रांगेत शिकाऊ विमान कोसळले. दिवसाची वेळ होती म्हणून मदतीचे हात पुढे सरसावले. संध्याकाळ किंवा रात्री विमान कुठे कोसळले हे समजणे कठीण गेले असते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्या स्थळी पोहचणे कठीण होते. अंदाज घेत ते तिथे पोहचले. पायलट नूर अल अमीन तर जागीच ठार झाला होता.

ॲम्‍बुलन्‍स नव्‍हे बांम्‍बूलन्‍सची टीम पोहचली

पायलट साथीदार मृत्युमुखी पडला आहे. आजूबाजूला कोणीच नाही, राज्य बदल झालेल्या जखमी अंशीकाला त्यावेळी सर्वात अगोदर धीर देण्याची गरज होती. मदत कार्य पोहचायला उशीरच झाला. या मदत कार्यात अगोदर पोहचलेला रमेश बारेला, सुमन्या बारेला, राजाराम, बिसन, एकनाथ, सैराम, विक्की यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पहाडात जखमी अंशीकाला आणण्यासाठी समय सुचकता दाखवत त्यांनी पहाडात सर्रास वापरली जाणारी पेशंटला नेण्याची बांम्बूलेन्स साड्यांची झोळी बनवून तीन किलो मीटरवरच्या अँम्बूलेन्सपर्यंत आणले. अंशिकाचा जीव वाचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही.

अंशिकासाठी तो प्रसंग कायम स्‍मरणातील

साधारणपणे साडेतीनच्या सुमारास अपघात घडला आणि चार वाजेनंतर मदत करणारे तेथे पोहचले. तीन किलोमीटर पायवाटेचा रस्ता होता. अंशिका ज्याअर्थी विमान शिकण्यासाठी प्रवेशित होती; त्याअर्थी तिची घरची परिस्थिती पाहता पहाडात झालेला अपघात, ठार झालेला पायलट आणि जखमी अवस्थेसह पायलट असलेल्या अंशिका लखन गुजर हिची मनःस्थिती काय असेल हे सर्व विचारा पलीकडले आहे. मूळ खरगोनमधील अंशिकासाठी वर्डीचा परिसर नवीन होता. पण अंशिकाला मोठ्या अपघातातून जीवनदान मिळाले; हे तिच्‍या कायम स्‍मरणात राहिल. मात्र भविष्यात त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यायचीच झाल्यास रमेश बारेला शौर्य पदकाचा मानकरी ठरेल; अशी शासकीय हालचालही व्हायला हवी!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT