Electricity Bill Saam tv
महाराष्ट्र

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन

Rajesh Sonwane

जळगाव : वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात खान्देशातील ४ लाख २० हजार ग्राहकांनी ६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला. (jalgaon news consumers paid their electricity bills online)

महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल (Mahavitaran Bill) पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात २ लाख ६४ हजार २६३ ग्राहकांनी ३९ कोटी ४ लाख, धुळे (Dhule) जिल्ह्यात १ लाख ११ हजार ९८९ ग्राहकांनी १८ कोटी ५० लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ हजार ७६८ ग्राहकांनी ६ कोटी ४३ लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे.

'गो-ग्रीन'द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवा

महावितरणने (MSEDCL) लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे.

बिलात ०.२५ टक्के सूट

ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाईन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते. तसेच जबिलाचे ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT