Jalgaon News Railway  Saam tv
महाराष्ट्र

प्रवाशांच्‍या हृदयाचा ठोका चुकला; धावत्‍या पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे डबे राहिले मागे; मोठा अनर्थ टळला

प्रवाशांच्‍या हृदयाचा ठोका चुकला; धावत्‍या पाटलीपुत्र एक्स्प्रेसचे डबे राहिले मागे; अपघात टळला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुंबईहून पाटणाकडे जाणाऱ्या धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या. तर अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. या घटनेमुळे काही काळ रेल्वेची (Railway) वाहतूक ठप्प झाली आहे. (Jalgaon News Railway Accident)

भुसावळमार्गे (Bhusawal) लोकमान्य टिळक टर्मिनलला जाणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनपासून काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली. तर अर्धे डब्बे मागेच राहिले. रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. मात्र रेल्‍वेतील प्रवाशांच्‍या हृदयाचा ठोका चुकला होता. वेळीच सदर प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले तर तुटलेले मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले.

तीन किलोमीटर पुढे गेली रेल्‍वे

धावत्‍या रेल्‍वेचे काही डबे अचानक वेगळे झाल्‍याने प्रवाशांनी आरडाओरडा सुरू झाली. सदर प्रकार लोकोपायलटच्‍या लक्षात आल्‍यानंतर एक्स्प्रेस थांबवली. परंतु, इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT