Death Saam tv
महाराष्ट्र

लग्नघरावर दुःखाचा डोंगर..विजेचा धक्‍का लागून चुलत भावाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : मामलदे (ता. चोपडा) येथे २७ वर्षीय आयटी इंजिनिअर युवकाचा पाण्याची मोटर लावत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. एकीकडे लग्नाची धामधूम असताना दुसरीकडे अशी दुःखद घटना घडल्यामुळे (Jalgaon News) सर्वच शोककळा पसरली आहे. (jalgaon news chopda wedding house Cousin death due to electric shock)

मामलदे (ता. चोपडा) येथील सुनील पाटील यांचे मोठे बंधू सतीश पाटील यांचा मुलगा महेंद्र पाटील याचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. शनिवारी (ता. २३) मामलदे येथे महेंद्र याचा हळदीचा कार्यक्रम होता लग्न घरात पाहुणे मंडळींची वर्दळ होती. यावेळी बंगलोर येथे नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर असलेला अमोल पाटील हा ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरून काम करीत होता. यावेळी अमोल सकाळी पाण्याची मोटर लावत असताना त्यास जोरात विजेचा धक्का बसला. यावेळी तो मागे फेकला जाऊन डोक्यावर पडला. डोक्यास जबर दुखापत होऊन अमोलचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेती विकून शिक्षण दिले

आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला अमोल पाटील हा अतिशय मितभाषी व हुशार असल्याने त्याच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी काही शेती विकून अमोलचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याची जाण ठेवत अमोलने ही आयटीत शिक्षण पूर्ण केले. बंगलोर येथे एका नामांकित कंपनीत नोकरीला सुरुवात केली होती. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरून काम सुरू होते. यातच आई वडिलांना कामात मदत करणारा अमोलवर आज काळाने घाला घातला.

लग्नघरावर दुःखाचा डोंगर

भावाच्या लग्नापूर्वीच चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत अमोलच्या पश्चात वडील, आई, बहिण, लहान भाऊ असा परिवार आहे. लग्नामुळे कुटुंब, नातेवाईक आणि गाव-गल्लीत आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे क्षणार्धात चित्र पालटून मामलदे गावावर शोककळा पसरली आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

SCROLL FOR NEXT