Farmer Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Farmer Rasta Roko : चोपडा तालुका मदतीपासून वगळला; बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

Jalgaon News : चोपडा तालुक्यात पाऊस जास्तच प्रमाणात पडलेला असल्याने प्रशासनाने शेतातील नुकसानग्रस्त भागातील फोटो वरिष्ठांकडे पाठवले आहे. तरी देखील चोपडा तालुका वगळण्यात आला असा आरोप

संजय महाजन

जळगाव : राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला नुकसानग्रस्त भाग म्हणून वगळण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. 

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जात आहे. शासनाने मदतीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या जीआरमध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके बाधित असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यानंतर चोपडा व यावल तालुका वगळण्यात आला आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र भावना 
चोपडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात सरकारने निर्णय का घेतला. आतापर्यंत चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकसभेत व विधानसभेत सरकारला मतदान करून त्यांचं काम केलं त्याच परतफेड म्हणून चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना ये फळ मिळालं का? असा सवाल करत बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील आलेल्या शेतकऱ्यांच्या सरकार विरुद्ध भावना तीव्र शब्दातून व्यक्त केल्या. 

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा 
जळगाव जिल्ह्यातील ज्या काही तालुक्यांना मदतमध्ये सामील केले आहे. त्या तालुक्यांपेक्षा चोपडा तालुक्यात पाऊस जास्तच प्रमाणात पडलेला असल्याने प्रशासनाने शेतातील नुकसानग्रस्त भागातील फोटो वरिष्ठांकडे पाठवले आहे. तरी देखील चोपडा तालुका वगळण्यात आला असा आरोप शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांनी केला. दरम्यान चोपडा तालुका सहभागी नाही केले, तर येणाऱ्या काही दिवसात मोठ्याप्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल; असा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT