Chimanrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: शिंदे गटात पहिल्या फळीत सहभागी तरी मंत्रिपदासाठी उपेक्षाच

शिंदे गटात पहिल्या फळीत सहभागी तरी मंत्रिपदासाठी उपेक्षाच

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सत्‍तेतून बाहेर पडत शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत बाहेर पडले. त्‍यांच्‍यासोबत शिवसेनेतील आमदार देखील होते. या आमदारांच्‍या पहिल्‍या फळीत पारोळा मतदार संघातील (Shiv Sena) शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचा देखील समावेश होता. यामुळे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर मंत्रीमंडळात आमदार पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोरीनंतरही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली आहे. (Jalgaon News Chimanrao Patil)

पारोळा (Parola) मतदार संघातील चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. पारोळा मतदार संघात शिवसेना वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे. ते तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार असताना त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर सर्वात प्रथम आमदार चिमणराव पाटील त्यांच्या सोबत होते. बंडखोरीत सुरत येथे त्यांचा समावेश होता, त्यानंतर गुवाहाटी येथे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटाच्या बंडखोरीचे समर्थन करणारी भूमिका विशद केली होती. या शिवाय बंडखोरांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार असल्याने एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपदाची संधी देतील, अशी अपेक्षा होती.

‘लास्ट कमर’ला संधी

गुवाहाटी येथे सर्वात शेवटी आलेले दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. केसरकर यांनी आपल्या वर्क्तृत्व शैलीचा वापर करीत ते शिंदे गटाचे प्रवक्ते बनले. गुलाबराव पाटील हेसुध्दा नंतर गुवाहाटी येथे गेले. मात्र त्यांनीही विधिमंडळात शिंदे गटाची बाजू सक्षमपणे मांडून आपला ठसा उमटविला. शिवसेनेत मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या चिमणराव पाटील यांना बंडखोरीनंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी असली तरी पुढील मंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळावर त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा असून त्याचीच त्यांना आता प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT