Balasaheb Thorat: शिंदे– फडणवीस सरकारने इतिहास रचला; माजी मंत्री थोरात यांचा टोला

शिंदे– फडणवीस सरकारने इतिहास रचला; माजी मंत्री थोरात यांचा टोला
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

धुळे : शिंदे– फडणवीस सरकारच्या स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. उलट अत्याचाराचे आरोप असणारे मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आले आहेत. गेल्या दीड महिना मंत्रिमंडळ नव्हते, ही देखील ईतिहासातली पहिली घटना असून त्यांनी (Dhule News) इतिहास रचला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 24 तास उलटून देखील अद्यापही खाते वाटप झाले नाही. यावरून यांच्यात किती मतभेद आहेत; हे लक्षात येत असल्याचा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर लगावला आहे. (Dhule News Balasaheb Thorat)

Balasaheb Thorat
पुराच्या पाण्यात कार गेली वाहून..वेळीच मदत मिळाल्याने दोघांचे वाचले प्राण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे (Dhule) तालुक्यातील कापडणे येथून आझादी गौरव पदयात्रेला आज माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या पदयात्रेत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थ तसेच काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

दोन कोटी नोकऱ्या देणारे कुठे आहेत?

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर तसेच सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे, तसेच गॅस महागल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच काम केंद्र सरकारने केले असल्याचे म्हणत बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणारे कुठे आहेत; असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केंद्रसरकारवर उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com