वीज
वीज  
महाराष्ट्र

दैव बलबत्‍तर म्‍हणून तो वाचला; डोळ्यासमोर वीज कडाडली अन्‌

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : लांबेवडगाव (ता.चाळीसगाव) शिवारात साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. त्यात वीज पडून तीन शेळ्यांचा जागीच मृत्यु झाला. तर शेळ्या चारणारा तरूण पावसापासून बचाव करण्यासाठी बाजुच्या झोपडीत शिरल्याने वाचला. (jalgaon-news-chalisgaon-Three-goats-die-in-lightning-strike-in-Lambe-Wadgaon-young-man-survived)

लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) शिवरात शेळ्या चारत असतांना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यावेळी येथील रोहीदास मंगा भील यांचा मुलगा सुनील हा लांबे वडगाव शिवारातील कैलास पाटील यांच्या शेताजवळ शेळ्या चारत होता. मुसळधार पावसामुळे सुनील हा जवळच्या झोपडीत आसरा घेण्यासाठी गेला असता त्याचवेळी आकाशातून वीज कडाडली व ती शेळ्यांवर पडली. त्यात तीन शेळ्यांचा जागीच मृत्यु झाला. सुदैवाने सुनील भील याने वेळीच झोपडीत धाव घेतल्याने तो वाचला.

शेळ्यांच्‍या मृत्‍यूने मोठे नुकसान

रोहिदास भील यांची अत्यंत गरीबीची परिस्थिती असून वीज कोसळून तीन शेळ्यांचा जागीच मृत्यु झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा तलाठी डी. एस. काळे यांनी पंचनामा केला आहे. यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, किरण जोशी आदी उपस्थित होते. रोहीदास भील यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: Vijay Shivtare यांनी अजित पवारांची घेतली भेट! कारण नेमकं काय?

Himayatnagar : हिमायतनगरमध्ये भीषण पाणीटंचाई, 19 कोटी रुपयांच्या योजनेचा नुसताच गाजावाजा; महिला उपाेषणाच्या तयारीत

May Month Born Babies: मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात हे खास गुण; जाणून घ्या

Babara Ramdev News : बाबा रामदेव यांना धक्का, पतंजलीच्या 14 उत्पादनावर बंदी

Colon Cancer : कोलोरेक्टल कर्करोग कसा होतो? जाणून घ्या याच्या विविध टप्प्यांविषयी

SCROLL FOR NEXT