सेवा बजावतांना जम्मू– काश्मीरला पातोंड्याच्‍या जवानाचा मृत्‍यू

सेवा बजावत असताना पातोंडा येथील जवानाचा मृत्‍यू
Soldier death
Soldier death

जळगाव : जम्मू– काश्मीरमधील सांबा येथे पातोंडा (ता.अमळनेर) येथील जवान गणेश भिमराव सोनवणे (वय ३६) हे कार्यरत होते. सेवा बजावत असताना मंगळवारी सायंकाळी त्‍यांचे आकस्मिक निधन झाले. गणेशच्या निधनाची बातमी कळताच कुटूंबांवर व गावावर शोककळा पसरली.

गणेश सोनवणे हे वयाच्या विसाव्या वर्षी देशसेवेत दाखल झाले. त्याचे पार्थिव आर्मीचे सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई येथे आणले जाणार असून मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पातोंडा येथे येणार आहे. त्या करीता आवश्यक होकार पत्नी सीमा यांनी आर्मी अधिका-यांना कळवले आहे.

Soldier death
पूर्ण शुद्धीत लिहून देतो की..मी चाळीसगावचा समाधानी नागरिक आहे; शपथपत्र बनले चर्चेचा विषय

डिसेंबरमध्‍ये होती निवृत्‍ती

गणेश सोनवणे हे १४ मराठा बटालियनमध्‍ये सेवेत असून त्यांची आतापर्यंत १६ वर्ष ९ महिने सेवा झाली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात १७ वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होते. तोवर त्यांच्यावर काळाने घाला घातला.

उद्या गावात अंत्‍यसंस्‍कार

गणेश यांच्‍यावर उद्या (ता. ७) पातोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. गणेशच्या पश्चात आई, पत्नी सीमा, प्रांजल (१२ वर्ष) व पिऊ (९ वर्ष) दोन मुली असा परीवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com