Colon Cancer Causes, Stages: कोलोरेक्टल कर्करोग कसा होतो? जाणून घ्या याच्या विविध टप्प्यांविषयी

Colon Cancer Reason and Stages Information in Marathi: कोलोरेक्टल कर्करोगाची सुरुवात कोलन किंवा गुदाशयातील पॉलीपपासून सुरु होते, ज्यावर उपचार न केल्यास कालांतराने त्याचे कर्करोगात रुपांतर होऊ शकते.
Colon Cancer Causes in Marathi
Colon Cancer Causes in MarathiSaam Tv

कोलोरेक्टल कर्करोगाची सुरुवात कोलन किंवा गुदाशयातील पॉलीपपासून सुरु होते, ज्यावर उपचार न केल्यास कालांतराने त्याचे कर्करोगात रुपांतर होऊ शकते. कोलोरेक्टल कर्करोगाचे नेमके कारण पूर्णपणे समजलेले नसले तरी वय, कौटुंबिक इतिहास, धूम्रपान आणि प्रक्रिया केलेले अन्न सेवन यासारखे घटक कारणीभूत ठरतात.

नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअरचे संचालक हेपॅटोबिलरी पॅनक्रियाटिक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजी डॉ. गणेश नागराजन म्हणतात की, वेळीच निदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवून आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करा. कोलोरेक्टल कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. प्रत्येकाला या कर्करोगाच्या (Cancer) विविध टप्प्यांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.

Colon Cancer Causes in Marathi
Mouth Cancer : मौखिक कर्करोगाला प्रतिबंध कसे कराल? जाणून घ्या डॉक्टरांकडून

कोलोरेक्टल कर्करोगाच्या विविध टप्प्यांबद्दल जाणून घ्या

प्रारंभिक अवस्थेतील कोलोरेक्टल कॅन्सरला स्टेज झिरो किंवा कार्सिनोमा इन सिटू असे म्हणतात. यात कर्करोगाच्या पेशी कोलन किंवा गुदाशयाच्या सर्वात आतील अस्तराच असतात.निवडक रूग्णांमध्ये एंडोस्कोपिक म्यूकोसल रिसेक्शनद्वारे यावर उपचार केले जाऊ शकतात.

कोलोरेक्टल कर्करोगाचा पहिला टप्पा -

कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये न पसरता कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीच्या खोलवर स्थित असतात. कर्करोगाच्या पेशी कोलन किंवा गुदाशयाच्या सर्वात आतल्या अस्तरात असतात आणि ऊतींच्या दुसऱ्या थरात (सबम्यूकोसा) किंवा काहीवेळा शेजारील स्नायूंच्या थरापर्यंत (मस्कुलरिस प्रोप्रिया) विस्तारलेल्या असतात मात्र आसपासच्या लिम्फ नोड्सवर आक्रमण केले नसते.यावर पारंपरीक शस्त्रक्रियेसह रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपिक तंत्राचा देखील वापर केला जाऊ शकतो.

Colon Cancer Causes in Marathi
Cancer Prevention: रोजच्या जीवनशैलीत करा बदल, कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून राहाल दूर!

कोलोरेक्टल कॅन्सरचा दुसरा टप्पा -

यामध्ये ट्यूमर लिम्फ नोड्सपर्यंत पोहोचत नाहीत परंतु कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीपर्यंत जवळच्या ऊतींमध्ये किंवा अवयवांमध्ये विस्तारू शकतात. या रुग्णांना रेडिओलॉजी आणि योग्य शस्त्रक्रिया नियोजनाद्वारे काळजीपूर्वक मूल्यांकनाची आवश्यक आहे. यापैकी काही रेक्टल कॅन्सरना शस्त्रक्रियेपूर्वी केमो रेडिएशनची आवश्यकता असते.

कोलोरेक्टल कर्करोगाचा तिसरा टप्पा:

कर्करोगाच्या पेशी स्थानिक लिम्फ नोड्सपर्यंत विस्तारल्या आहेत परंतु या नोड्सच्या पलीकडे वाढलेल्या नाहीत.

स्टेज 3ए मध्ये कॅन्सरने कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीच्या सुरुवातीच्या दोन आतील स्तरांमध्ये (श्लेष्मल त्वचा आणि सबम्यूकोसा) प्रवेश केलेला असतो आणि शक्यतो तो तिसऱ्या स्तरापर्यंत (मस्क्युलर प्रोप्रिया) पोहोचतो. याचा परिणाम जवळपास एक ते तीन लिम्फ नोड्सवरही झालेला आहे किंवा कर्करोगाच्या पेशी या लिम्फ नोड्सच्या जवळ पोहोचतात. शिवाय, कॅन्सर कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीच्या पहिल्या दोन थरांतून आत शिरतो आणि जवळपासच्या चार ते सहा लिम्फ नोड्समध्ये पसरला आहे.

स्टेज 3बी दरम्यान, कर्करोगाने कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीच्या बाहेरील थरात प्रवेश करतो, शक्यतो पोटाच्या अवयवांच्या सभोवतालच्या ऊतींमध्ये पसरलेला असतो परंतु शेजारच्या अवयवांपर्यंत पोहोचत नाही. कर्करोग स्नायूंच्या थरात किंवा आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या सर्वात बाहेरील भिंतीच्या थरात वाढतो आणि जवळच्या लिम्फ नोड्सवर परिणाम करतो.

Colon Cancer Causes in Marathi
Prostate Cancer Symptoms: पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कॅन्सरचा धोका? ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला

स्टेज 3सी मध्ये, कॅन्सर कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीच्या पलीकडे वाढला आहे आणि शेजारच्या अवयवांमध्ये न पसरता पोटाच्या अवयवांना अस्तर असलेल्या ऊतींवर आक्रमण केले आहे. कर्करोगाच्या पेशी जवळपास सहा पेक्षा जास्त लिम्फ नोड्समध्ये ओळखल्या जातात. हे कोलन किंवा गुदाशयाच्या भिंतीद्वारे भंग केले जाऊ शकते किंवा जवळपासच्या सात किंवा अधिक प्रभावित लिम्फ नोड्ससह पोटाच्या (Stomach) अवयवांच्या अस्तरांमध्ये पसरू शकते. याचे दीर्घकालीन परिणाम स्टेज 1 आणि 2 पेक्षा गंभीर असतात.

कोलोरेक्टल कॅन्सरचा टप्पा 4:

हा मेटास्टॅटिक कोलोरेक्टल कॅन्सर आहे जो कोलन किंवा गुदाशयाच्या पलीकडे शरीराच्या दूरच्या भागात पसरला आहे, ज्यामध्ये विविध ऊती आणि अवयवांचा समावेश आहे. यकृत हे मेटास्टॅटिक प्रसाराचे सर्वात सामान्य ठिकाण आहे. काही इतर क्षेत्रांमध्ये लिम्फ नोड्स, फुफ्फुस, हाडे किंवा मेंदू यांचा समावेश आहे.

यकृतातील मेटास्टॅसिस बऱ्याच प्रकरणांमध्ये टार्गेटेड थेरपी आणि त्यानंतर शस्त्रक्रिया ही केमोथेरपीच्या संयोजनाने पूर्णपणे उपचार करण्यायोग्य आहे. फुफ्फुसातील मेटास्टॅसिसची संख्या कमी असल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात. ट्यूमरची अवस्था आणि स्थान यावर आधारित त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. उपचार करणारा डॉक्टर तुमच्यासाठी वैयक्तिक उपचार योजना ठरवेल. कर्करोगावर मात करण्यासाठी वेळीच निदाम आणि उपचार गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com