महाराष्ट्र

चाळीसगाव परिसरात ढ़गफुटी; वाकडी शिवारातून दोनशे गुरे वाहिली

चाळीसगाव परिसरात ढ़गफुटी; मुंदखेड़ा शिवारातून दोनशे गुरे वाहिली

सांम टीव्ही न्यूज

चाळीसगाव (जळगाव) : शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितुर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अर्धे चाळीसगाव शहर पाण्याखाली आले आहे. सकाळी लवकर हे पाणी आल्याने अनेक नागरीक झोपेतच होते. यामुळे अद्यापपर्यंत नुकसानीचा अंदाज आलेला नाही. नदी पात्र उथळ झाल्याने शहरात पाणी शिरले. तसेच मुंदखेड़ा शिवारातून दोनशे गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविन्यात आली आहे. (Jalgaon- news-chalisgaon-aria-heavy-rain-droped-late-night)

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मध्यरात्रीचे थैमान

चालीसगांव तालुका परिसरात अनेक गावंमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचे थैमान सुरु झाले. यात मुंदखेड़ा, वाकळी, रोकड़े, पानगांव, बोरखेड़ी या गावंना पुराचा वेढा आहे. यातील वाकळी गावतुन दोन ट्रैक्टर व 200 गुरे वाहून गेल्याची शक्यता वर्तविन्यात आली आहे.

सतर्कतेचा इशारा

पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे. सद्यस्थितीत आता जामदा बधार्‍यावरून 1500 क्यूसेक पाणी जात असून दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

गिरणा नदी काठावरील गावांना याद्वारे थोक्याचा इशारा देण्यात येत आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात 31 ऑगस्टला दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील जळतंन सामान, चारा तसेच रहिवास हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे.असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT