Chalisgaon News
Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon: एसी, गॅस सिलेंडरसह बरेच काही; किराणा माल, खाद्य तेलाचीही चोरी

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : लांबे वडगाव (ता.चाळीसगाव) येथील एका शेतातील घरातून चोरट्यांनी भरलेल्‍या (Gas Cylinder) गॅस सिलेंडरसह शेगडी, भांडी, किराणा सामान भरलेल्या बरण्या व 5 लिटर तेलाची कॅन असा सुमारे 42 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Chalisgaon News)

लांबे वडगाव (ता. चाळीसगाव) येथील सोमसिंग देवसिंग राजपूत यांचे लांबे वडगाव शिवारात शेत आहे. लखन बालु पाटील हा शेतगडी म्हणून काम करतो. आज (ता.4) शेतगडी लखन हा शेतात विहीरीवरील पाण्याची (Jalgaon) मोटार सुरू करण्यास गेला असता शेतातील घराचे कडीकोंडा तुटलेला दिसला. ही माहिती मिळाल्यानंतर सोमसिंग राजपूत यांनी शेतात धाव घेतली. सोमवारच्‍या सायंकाळी 7 ते आजच्‍या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने (Theft) घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरा प्रवेश करून वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सोमसिंग राजपूत यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४२ हजाराचा ऐवज लांबविला

चोरट्यांनी घरातून 15 हजार रूपये किंमतीची गॅस शेगडी, घरगुती उपयोगी भांडी तसेच किराणा सामान भरलेल्या बरण्या, 20 हजार रूपये किंमतीचा एसी, 3 हजार रूपये किंमतीचे इनव्हर्टर मशिन, 2 हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटर व 400 रूपये किंमतीचे 5 लिटर तेलाची कॅन असा सुमारे 42 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT