Nandurbar: लाल मिरचीची आवक सुरू; बाजार समितीत मिळतोय चांगला दर

लाल मिरचीची आवक सुरू; बाजार समितीत मिळतोय चांगला दर
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : लाल मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. मिरचीची आवक सुरू होण्यासोबतच यंदा (Farmer) शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. (Nandurbar Bajar Samiti News)

Nandurbar News
Crime News: अल्‍पवयीन मुलीवर 70 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

लाल मिरची खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या (Nandurbar) नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार (Bajar Samiti) समितीत यंदा नवरात्र उत्सवा दरम्यानच सुरुवात झाली. रोज 40 ते 50 वाहनांमधून लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले दर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता असून यंदा सुरुवातीपासूनच 4000 ते 6000 पर्यंत लाल मिरचीला दर मिळत असल्याचे कृषी उत्पन्न बाजारात दिसून येत आहे.

चांगल्‍या पावसाचा फायदा

मिरची उत्पादक शेतकरी ही मिळत असलेला दराबाबत समाधानी असून दसरा, दिवाळी दरम्यान आणखी चांगले दर यंदा मिळण्याची शक्यता आहे. तसेच मिरची सुकवण्यासाठी पथारींची संख्या देखील यंदा अधिक वाढण्याची शक्यता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केली आहे. एकूणच यंदा झालेला समाधानकारक पाऊस मिरची पिकाला उपयुक्त ठरला असून उत्पादन चांगले येऊन चांगले दर मिळण्याची आशा मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com