15 Lakh Rs Seized In Jalgaon Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon News: जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १५ लाखांची रोकड जप्त

15 Lakh Rs Seized In Jalgaon: जळगाव शहरात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये १५ लाख रुपये आढळून आले. पोलिसांनी हे पैसे जप्त केले.

Priya More

संजय महाजन, जळगाव

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. यादरम्यान कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत मोठी रक्कम जप्त केली आहेत. अशामध्ये जळगावमध्ये देखील पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १५ लाखांची रोकड जप्त केली आहे. जळगाव शहरात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकी चालकाची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये हे पैसे आढळून आले. या पैशांबाबत दुचाकीस्वार समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे पोलिसांनी हे पैसे जप्त करत कारवाई केली. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ आज सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडील १४ लाख ८५ हजारांची रोकड जप्त केली. संबंधित व्यक्तीला रोकडसंबंधी कुठलीही कागदपत्र सादर न करता आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ ही रक्कम जप्त केली. चोपडा तालुक्यातील डी. के. पाटील नावाची ही व्यक्ती बुलेटवरून जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याच्या बॅगची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल १५ लाखांची रक्कम आढळून आली.

या रोकडसंबंधी दुचाकीस्वार डी. के पाटील यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान पाटील यांनी हे पैसे आपल्या शेतीशी संबंधित असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, 'नाकाबंदी दरम्यान बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडील बॅगची आम्ही तपासणी केली असता त्यात १४ लाख ८५ हजरांची रोकड सापडली. संबंधिताला पैशांविषयी व्यवस्थित माहिती न देता आल्यामुळे रोकड आम्ही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT