Jalgaon Vidhan Sabha : जळगाव शहरात बंडखोरी करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; भाजपकडून कारवाई

Jalgaon News : जळगाव शहर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे राजूमामा भोळे याना उमेदवारी देण्यात आली आहे
Jalgaon Vidhan Sabha
Jalgaon Vidhan SabhaSaam tv
Published On

जळगाव : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली होती. माघारीच्या दिवशी पक्ष श्रेष्टींकडून माघार घेण्यास सांगितल्यानंतर देखील काहींनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यानुसार जळगाव शहर मतदारसंघात भाजपच्या दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांवर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. 

विधानसभा निवडणूकीत आता रंग चढू लागला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या (Mahayuti) उमेद्वारांसोबतच बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांचा देखील आता प्रचार सुरु आहे. दरम्यान मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिल्यानंतर देखील बंडखोरी करण्यात आली आहे. त्यानुसार (Jalgaon) जळगाव शहर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे राजूमामा भोळे याना उमेदवारी देण्यात आली आहे. तरी देखील भाजपचेच माजी उपमहापौर अश्विन सोनवणे व माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. 

Jalgaon Vidhan Sabha
Muktainagar News : अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणारा एकजण ताब्यात; दोघे अजूनही फरार

दरम्यान अर्ज माघारीच्या दिवशी (BJP) भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम राहिले आहेत. आता या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. यामुळे जळगाव शहर मतदारसंघात मतविभाजन होऊन फटका बसण्याची शक्यता आहे.  

Jalgaon Vidhan Sabha
Dhule News : धुळे जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

भाजपकडून दोघांचे निलंबन 

महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. नेत्यांकडून माघारी घेण्यासंदर्भात सूचना देऊन सुद्धा दोघांनी माघार न घेतल्याने पक्षाच्यावतीने दोघांवर कारवाई करण्यात आले आहे. भाजपच्या या दोघं पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून भाजपच्या कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी कारवाई केल्याबाबतचे पत्र समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com