Jalgaon Police News Saam tv
महाराष्ट्र

आक्षेपार्ह वक्तव्य..निलंबनानंतर निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल; क्लिप व्हायरल करणारा हजेरी मास्तरही निलंबित

आक्षेपार्ह वक्तव्य..निलंबनानंतर निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल; क्लिप व्हायरल करणारा हजेरी मास्तरही निलंबित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले याच्या विरुद्ध जिल्‍हापेठ पोलिस (Jalgaon Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा हजेरी मास्तर अशोक महाजन याला निलंबित करण्यात आले आहे. (Jalgaon News Kirankumar Bakale)

स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांनी मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio Clip) होऊन तीव्र पडसाद उमटले. (Police) पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बकाले यांना मंगळवारी (ता.१३) मध्यरात्रीच गुन्हेशाखेचा पदभार काढून घेत नियंत्रण कक्षात बदली केली. बुधवारी समस्त मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय नेत्यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून (Jalgaon) खातेंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, खात्यातून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने विनोद पंजाबराव देशमुख यांनी आज जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात नमूद केल्याप्रमाणे, निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवीगाळ केल्याच्या व्हायरल क्लिपच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. बकाले यांची खातेंतर्गत चौकशी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता यांना सोपविण्यात आली आहे.

महाजनही निलंबित

निरीक्षक बकाले यांच्याशी मोबाईलवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ रेकॉडींग व्हायरल करणाऱ्या अशोक ओंकार महाजन यांचे निलंबन करण्यात आले आहे. वाहतूक शाखेतही हजेरी मास्तर असताना तत्कालीन निरीक्षकाच्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. अशोक महाजन यांचे मूळगाव जामनेर असून त्यांचा राजकीय दबदबा पोलिस खात्यात सर्वश्रृत आहे. वाहतूक शाखेत हजेरी मास्तर पदावर कार्यरत असताना तत्कालीन निरीक्षक देविदास कुनगर यांच्या दालनात वाळू माफियांसोबत साजरा झालेल्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT