जळगाव : राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी टीका केली. या विरोधात मतदार संघातील गुलाबराव पाटील यांच्या समर्थक शिवसैनिकांन शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला. मुर्दाबाद मुर्दाबाद..संजय राऊत मुर्दाबाद, गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. (jalgaon news Burning of Sanjay Raut statue Protest against Gulabrao Patil statement)
राज्यात शिवसेनेतील आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जात बंड केला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. यातच जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील बंडखोरीत सहभागी असल्याने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका करताना पाटलाला परत पानटपरी चालवावी लागेल; असे वक्तव्य करत टीका केली आहे. या विरोधात जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत.
राऊत मागच्या दारातून खासदार झाले
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे शिवसे कार्यकत्र्यांची भावना दुखावली आहे. गुलाबराव पाटील हे तळागाडातील नेता असून सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा नेता असा प्रवास त्यांचा आहे. चार वेळेस ते जनतेतून निवडून आले असून त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. संजय राऊत हे मागच्या दारातून खासदार झाले असल्याची संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल आहे. त्यांनी असे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. याच विरोधात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. नेता सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळून ठेवली आहे. यामुळे गुलाबराव पाटील हे आमचे नेते असून त्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.