bsnl
bsnl saam tv
महाराष्ट्र

BSNL: 'बीएसएनएल’चे सीम ‘ॲक्टिव्हेट’ होईना; कार्यालयाचे हात वर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : ‘बीएसएनएल’ने मोबाईल सेवेचे ग्राहक वाढविण्यासाठी स्वस्तात सीमकार्डची योजना सुरू केली खरी. मात्र, ती कंत्राटदाराद्वारे राबविली गेली व कार्ड घेऊनही ते आठवडाभर कार्यान्वित होत नसल्याने ग्राहकांनी तक्रारी सुरू केल्या आहेत. त्यावर ग्राहकांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी ‘बीएसएनएल’चे (BSNL) कर्मचारी ग्राहकांना कंत्राटदाराचा संबंध आहे, त्यांच्याकडे जा.., अशी उत्तरे देत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. (jalgaon news BSNL sim not activated Office hands up)

मोबाईल (Mobile) सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत ‘बीएसएनएल’ला सुरवातीपासूनच संघर्ष करावा लागत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी ‘बीएसएनएल’नेही आकर्षक योजना देत ग्राहकांना स्वस्तात सीम कार्ड देण्याचे सुरू केले. त्यासाठी कंत्राटदाराकडे जबाबदारी सोपवली.

रस्त्यावर स्टॉल

याअंतर्गत ‘बीएसएनएल’च्या नावाने मायादेवीनगर एक्स्चेंजसमोरच रस्त्यावर काही दिवसांपासून स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवरुन काही ग्राहकांनी सीमकार्ड घेतले. त्यांच्याकडून नाममात्र रक्कम व आधारकार्डची (Adhar Card) झेरॉक्स घेण्यात आली. मात्र, तीन- चार दिवस, काहींच्या बाबतीत आठवडा होऊनही कार्ड कार्यान्वित अथवा सुरू झाले नाही.

कर्मचाऱ्यांचे हात वर

याबाबत काही ग्राहकांनी मायादेवीनगर एक्स्चेंज कार्यालयात जाऊन विचारणा केली असता तो स्टॉल कंत्राटदाराने लावला होता, त्याच्याशी बीएसएनएलचा काहीही संबंध नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे ग्राहक अधिकच संतप्त झाले आहेत. याबाबत बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी श्री. वाणी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात चौकशी करुन ग्राहकांना सुविधा द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

SCROLL FOR NEXT