Jalgaon News Marriage Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: लग्‍नासाठी सजलेल्‍या मंडपातून नववधूची अंत्‍ययात्रा; हळद लावण्यापूर्वी मुलीचे टोकाचे पाऊल

लग्‍नासाठी सजलेल्‍या मंडपातून नववधू अंत्‍ययात्रा; हळद लावण्यापूर्वी मुलीचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुलीच्‍या लग्‍नाची तयारी झालेली..मुलीला हळद लावून विदाईसाठीचा मंडप टाकण्याची तयारी झाली होती. परंतु, त्‍याच मुलीला हळद लागण्यापुर्वीच तिची अंत्‍ययात्रा काढण्याची दुर्देवी वेळ आई– वडीलांवर आली. ही घटना एरंडोल तालुक्यातील टोळी खु. या गावात घडली आहे. (Breaking Marathi News)

टोळी (ता. एरंडोल) येथील एका १८ वर्षीय युवतीचा विवाह करमाड येथे आज होणार होता. यासाठी घरामध्ये सर्व तयारी झाली होती. लग्‍न असल्‍याने आनंदाचे वातावरण पसरले होते. आजचे लग्‍न असल्‍याने सोमवारी (ता.२७) तिला वर पक्षाकडील मंडळी घेण्यासाठी येणार होते. करमाड येथे तिला सायंकाळी हळद लागणार होती. परंतु, त्‍यापुर्वीच मुलीची अंत्‍ययात्रा काढावी लागली.

मुलीचे टोकाचे पाऊल

टोळी येथे सोमवारी (ता.२७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास या नियोजित वधूने शेतातील विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. या प्रकारामुळे तिच्या आई– वडिलांसह लग्नानिमित्त आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी एकच हंबरडा फोडला. तर विवाह समारंभासाठी सजलेल्या मंडपातच तिच्‍या अंत्‍ययात्रेची तयारी करावी लागली. एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT