Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: वीज मीटर लावण्यासाठी दीड हजाराची लाच; टेक्नीशीयनसह खासगी पंटर ताब्‍यात

वीज मीटर लावण्यासाठी दीड हजाराची लाच; टेक्नीशीयनसह खासगी पंटर ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेतली. महावितरणच्या (Mahavitaran) टेक्नीशीयनसह खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत विभागाच्या (Jalgaon ACB) पथकाने वीज कंपनीच्या आवाराहत रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात एकाच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

तक्रारदार जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी यांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते. मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

सापळा रचत पकडले

तक्रारीच्‍या पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने १९ एप्रिलला दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशियन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तांदूळ आणि बटाट्यापासून बनवा 'हे' घरगुती फेस मास्क, मिनटांतच त्वचा दिसेल ग्लोइंग

Rohit Shetty: बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी रोहित शेट्टीच्या घरी झाडल्या गोळ्या, तपासात धक्कादायक खुलासा

PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा...

HSC Exam : १०० टक्के हवेत! पुण्यात शिक्षकानेच पुरवली कॉपी, बोर्ड काय कारवाई करणार?

2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

SCROLL FOR NEXT